Numerology Of Mulank 2 : अंकज्योतिष शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याबद्दल अंदाज लावता येतो. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार व्यक्तीची राशी असते त्याचप्रमाणे प्रत्येक अंकानुसार अंकज्योतिष (Ank Shastra) शास्त्रात मूलांक असतो. आतापर्यंत आपण अनेक मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव कसा असतो हे जाणून घेतलं आहे. आज आपण मूलांक 2 च्या लोकांचा स्वभाक कसा असतो आणि त्यांची खासियत काय असते हे जाणून घेणार आहोत. 


अंकशास्त्रात, मूलांक 2 ला देखील विशेष महत्त्व आहे. कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे मूलांक 2 चे लोक फार शांत आणि थोडे सेन्सिटिव्ह स्वभावाचे असतात. त्यामुळे एखादी कठीण परिस्थिती आली तर या लोकांच्या मनात आधी नकारात्मक विचार येतात. आणखी काय या मूलांकाचं वैशिष्ट्य आहे ते जाणून घेऊयात.  


शांत आणि इमोशनल स्वभावाचे असतात


मूलांक 2 असणारे लोक फार शांत, इमोशनल, सेन्सिटिव्ह, नम्र स्वभावाचे असतात. या जन्मतारखेचे लोक स्वत:ला कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर ठेवतात. तसेच, या लोकांना कोणत्याही समस्येवर शांतपणे संवाद साधून तोडगा काढायला आवडतो. 


फार मेहनती असतात


या जन्मतारखेचे लोक शांततापूर्ण, प्रामाणिक आणि साध्या सरळ स्वभावाचे असतात. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे लोक फार मेहनत घेतात. 


'ही' असते यांची कमजोरी 


या जन्मतारखेच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे तुमच्या करिअरमध्ये जर तुम्हाला चांगलं यश संपादन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या कंम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं गरजेचं आहे. करिअरमध्ये नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. तसेच, मनाला आणि बुद्धीला पटेल असंच काम करा. तरच तुम्हाला यश मिळेल. 


या जन्मतारखेचे लोक अनेकदा अपयश आल्यानंतर पटकन निराश होतात. यांच्यात प्रचंड आत्मविश्वासाची कमतरता असते. त्यामुळे नकारात्मक विचार करू नका. आव्हानांना घाबरू नका. तसेच, आयुष्यात यश संपादन करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा. 


'ही' गोष्ट फार नडते 


मूलांक 2 असणाऱ्या लोकांच्या अहंकारी स्वभावामुळे यांना आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे अहंकार करू नका. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : शेकडो वर्षांनंतर जुळून येणार अद्भूत योगायोग! शनी संक्रमणाच्या दिवशीच होणार सूर्यग्रहण; 2027 पर्यंत 'या' 3 राशींचे 'अच्छे दिन'