Numerology Mulank 1 : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 1 असलेल्या लोकांबद्दल देखील काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.


मूलांक 1 चे लोक अत्यंत चतुर असतात. सगळ्याच कामात त्यांचं डोकं फार चालतं. कोणाकडून कसं काम काढून घ्यायचं हे त्यांना बरोबर समजतं. बुद्धिमतेच्या बळावर हे लोक सर्व गोष्टी साध्य करतात. 1 या मुलांकाचा स्वामी सूर्य असल्याने त्यांच्यावर सूर्याचा प्रभाव असतो. या व्यक्तींबद्दल आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.


सगळ्याच गोष्टीत यांचं डोकं फार चालतं


1, 10, 19 किंवा 28 जन्मतारीख असलेले लोक फार हुशार असतात. त्यांना त्यांचा स्वार्थ बरोबर कळतो. ते प्रत्येक कामात परफेक्ट असतात. ते आपलं काम समोरच्याकडून बरोबर काढून घेतात. कुठे काय बोलायचं आणि कसं वागायचं याचं ज्ञान यांना असतं. माणसं जोडून ठेवण्याची सवय त्यांना असते.


सगळ्याच गोष्टीत यांचं डोकं फार चालतं


1, 10, 19 किंवा 28 जन्मतारीख असलेले लोक फार हुशार असतात. त्यांना त्यांचा स्वार्थ बरोबर कळतो. ते प्रत्येक कामात परफेक्ट असतात. ते आपलं काम समोरच्याकडून बरोबर काढून घेतात. कुठे काय बोलायचं आणि कसं वागायचं याचं ज्ञान यांना असतं. माणसं जोडून ठेवण्याची सवय त्यांना असते.


अवघड काळातही सावरतं घेतात


मूलांक 1 चे लोक त्यांच्या पडत्या काळातही सावरतं घेतात, ते जास्त खचून जात नाहीत. प्रत्येक कठीण काळाला ते ताकदीने सामोरं जातात आणि नकारात्मक गोष्टींचा परिणाम ते स्वत:वर जास्त होऊ देत नाहीत. नकारात्मक व्यक्तींपासून देखील ते चार हात लांब राहतात. त्यांच्या ध्येयावर त्यांचं लक्ष असतं आणि त्याच दिशेने त्यांची वाटचाल सुरू असते.


दुतोंडी स्वभाव यांना पटत नाही


मूलांक 1 च्या व्यक्ती बोलण्यात बेधडक असतात. एखाद्याच्या समोर एक आणि मागून एक बोलण्याची सवय त्यांना नसते. दुतोंडीपणा यांना आवडत नाही आणि त्यामुळेच त्यांना दुतोंडी व्यक्तींचा देखील राग येतो. अशा व्यक्तींपासून चार हात लांब राहणं ते पसंत करतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology : कशाचंही पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्या-छोट्या गोष्टींचा करतात अति विचार, मग यांना शांत करणं जातं कठीण