Numerology Of Mulank 1 : ज्योतिष शास्त्रात ज्याप्रमाणे राशींवरुन माणसाचा स्वभाव ठरवला जातो. त्याचप्रमाणे, अंकशास्त्रानुसार (Ank Shastra), व्यक्तीच्या स्वभावाची ओळख पटते. अंकशास्त्रात, प्रत्येक मूलांकाबद्दल (Mulank) काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या ठिकाणी आपण मूलांक 1 च्या मुलींचा स्वभाव नेमका कसा असतो ते जाणून घेणार आहोत. 


अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्याला ऊर्जेचं प्रतीक मानण्यात आलं आहे. त्यामुळे या मूलांकाच्या मुलींचा स्वभाव जाणून घेऊयात. मूलांक 1 असणाऱ्या मुली फार प्रामाणिक असतात. तसेच, बुद्धिवादी असतात. मूलांक 1 ची आणखी कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊयात. 


स्वभावाने रागिष्ट असतात


या जन्मतारखेच्या मुली स्वभावाने रागिष्ट असतात. यांच्या नाकाच्या शेंड्यावर राग असतो. या मुली छोट्या-छोट्या गोष्टींवरुन आपल्या रागावरचं नियंत्रण हरवून बसतात. त्यामुळेच कोणतंच नातं यांना फारसं टिकवता येत नाही. या जन्मतारखेच्या मुली आत्मनिर्भर, आत्मविश्वासू आणि साहसी स्वभावाच्या असतात. या मुली आपल्या स्वाभिमानाशी कधीच 
तडजोड करत नाहीत. 


प्रचंड स्वाभिमानी असतात


मूलांक 1 च्या मुलींना आपला स्वाभिमान फार प्रिय असतो. कोणत्याही परिस्थितीत त्या आपल्या स्वाभिमान कमजोर पडू देत नाहीत. या मुली फार रागिष्ट असतात. तसेच, यांना अन्याय सहन होत नाही. अन्यायाविरुद्ध लढण्यास नेहमी तत्पर असतात. 


मोकळेपणाने विचार व्यक्त करतात


तसेच, मूलांक 1 असणाऱ्या मुली मोकळेपणाने आपले विचार व्यक्त करतात. त्यांना कशाचीच भिती वाटत नाही. तसेच, जेव्हा जेव्हा यांच्या स्वाभिमानाला ठेच लागते. किंवा त्यांच्या कामात हस्तक्षेप केला जातो. तेव्हा तेव्हा या जन्मतारखेच्या मुलींचा राग अनावर होतो.  


आपल्या कर्तृत्वावर जगतात


या जन्मतारखेच्या मुली स्वाभिमानी असतातच. पण, आपली मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर त्या इतरांना प्रभावित करतात. कोणताही निर्णय हे अगदी तत्परतेने घेतात. तसेच, आपल्या निर्णयावर ठाम असतात. अनेकदा, यांचा हा स्वभाव इतरांना हट्टी वाटू शकतो. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :                                        


Rahu Shukra Yuti 2025 : तब्बल 18 वर्षांनंतर होणार राहु-शुक्राची युती; 28 जानेवारीपासून 3 राशींचा 'गोल्डन टाईम' सुरु