Numerology Mulank 7 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 7 असलेल्या लोकांची देखील काही वैशिष्ट्यं सांगितली गेली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.


मूलांक 7 चे लोक अत्यंत पराक्रमी असतात, त्यांचं मन चंचल असतं आणि त्यांना कधीच शांत बसवत नाही. सतत काहीतरी साहसी करण्याची इच्छा त्यांच्या मनात असते. या जन्मतारखेचे लोक डोक्याने देखील फार हुशार असतात. अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 च्या लोकांवर केतू ग्रहाचा प्रभाव असतो. जमीनजुमला, संपत्ती, मालमत्तेच्या बाबतीत देखील ते खूप भाग्यवान असतात. या मूलांकाशी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.


अतिशय पराक्रमी असतात 'या' जन्मतारखेचे लोक


7, 16 किंवा 25 जन्मतारखेचे लोक हे प्रचंड पराक्रमी असतात. त्यांना साधारण जीवन जगायला आवडत नाही. सतत काहीतरी वेगळं आणि साहसी करण्याची इच्छा त्यांच्या मनात असते. मूलांक 7 चे लोक हे एका जागेवर बसू शकत नाहीत, ते स्वभावाने एकदम चंचल असतात.


साहसी कामं करणं यांना आवडतं


मूलांक 7 चे  लोक खूप साहसी असतात आणि ते कोणत्याच आव्हानांना घाबरत नाहीत. ते आपल्या बुद्धीने आणि धैर्याने प्रत्येक आव्हानावर मात करतात. धाडसी गोष्टी करायला यांना खूप आवडतं, त्यांचं मन कधीच शांत राहत नाही. सतत काहीतरी वेगळं करण्याची इच्छा यांना होते आणि त्या दिशेने ते हातपाय हलवत राहतात.


नसतं साहस कधीकधी येतं अंगाशी


मूलांक 7 चे लोक अत्यंत साहसी असतात. जीवघेणी काम आणि क्रियाकल्प करायला यांना आवडतं, कधी कधी हाच स्वभाव त्यांच्या अंगाशी येतो. जीवाशी बेतणारे स्टंट करुन अनेकदा हे लोक स्वत:चं नुकसान करुन घेतात, कधीकधी दुखापती देखील सहन करतात. नशीब बलवत्तर म्हणून प्रत्येक संकटातून हे लोक सुखरुप बाहेर पडतात.


स्वतंत्र विचाराचे असतात हे लोक


अंकशास्त्रानुसार मूलांक 7 चे लोक स्वतंत्र विचारांचे असतात. हे लोक कधीही कोणाच्या दबावाखाली येत नाहीत. त्यांना स्वच्छंदी आयुष्य जगायला आवडतं. त्यांना एखाद्या व्यक्तीचं बोलणं पटलं नाही तर ते तोंडावर व्यक्त होतात, मागून बोलण्याची सवय यांना नसते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology : अतिशय चतुर असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्याकडून काम करुन घेणं यांना चांगलंच जमतं, नेहमी करतात स्वत:चाच विचार