Numerology: आजकाल आपण पाहतो, अनेक लोक उत्तम करिअर घडविण्यासाठी खूप मेहनत करतात. एखाद्या कंपनीची मोठ्या पगाराची संधी आली, तर ती सोडत नाही. मात्र काही लोक असे देखील असतात, ज्या लोकांच्या हातात उत्तम नोकरी असूनही ते त्या कंपनीत जास्त काळ टिकत नाहीत. वास्तविक पाहता अशा लोकांना एका ठिकाणी जास्त काळ राहणे आवडत नाही. वैदिक अंकशास्त्राच्या मदतीने आज आम्ही तुम्हाला अशा जन्मतारखांबद्दल सांगणार आहोत, ज्या दिवशी जन्मलेले लोक बराच काळ नोकरी करू शकत नाहीत. त्यांच्यासोबत असे काहीतरी घडते, ज्यामुळे त्यांना त्यांची नोकरी बदलावी लागते. अंकशास्त्रानुसार जाणून घेऊया..

हे लोक एकाच ठिकाणी जास्त काळ नोकरी करू शकत नाहीत..

तसं पाहायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात. काही लोक त्यांच्या नोकऱ्यांमध्ये चांगले काम करतात, तर बरेच लोक त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, एखाद्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तीने फक्त तेच काम करावे. तर अंकशास्त्रानुसार, काही लोकांना चांगली नोकरी मिळूनही ते ती नोकरी टिकवून ठेवू शकत नाही. हे लोक एकाच ठिकाणी जास्त काळ नोकरी करू शकत नाहीत आणि वारंवार नोकरी बदलतात.

अनेकदा नोकरीसाठी इकडे तिकडे फिरत राहतात...

अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या म्हणजेच मूलांकच्या मदतीने, त्याच्या स्वभावाबद्दल, सवयी, भाग्यवान करिअर आणि रंग इत्यादींबद्दल माहिती मिळते. आज आम्ही तुम्हाला अशा जन्मतारखांबद्दल सांगणार आहोत, ज्या दिवशी जन्मलेल्या लोकांना चांगली नोकरी मिळत नाही. काही ना काही कारणास्तव, हे लोक नोकरीसाठी इकडे तिकडे फिरत राहतात.

एका नोकरीवर जास्त काळ टिकून का राहत नाहीत?

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 24, 15 किंवा 6 तारखेला जन्मलेल्या लोकांचे मन चंचल असते. हे लोक कोणत्याही ठिकाणी जास्त काळ राहू शकत नाहीत. त्यांना गोष्टींचा आणि ठिकाणांचा खूप लवकर कंटाळा येतो. विशेषतः हे लोक जास्त काळ काम करू शकत नाहीत. म्हणून, या लोकांना स्वतःचे काम करण्याचा सल्ला दिला जातो.

 

प्रेम शेवटपर्यंत टिकवतात...

अंकशास्त्रानुसार, 24, 15 किंवा 6 तारखेला जन्मलेले लोक स्वतःवर खूप प्रेम करतात. हे लोक सुंदर असतात आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. या लोकांचे व्यक्तिमत्व देखील चांगले असते. प्रत्येक सुंदर गोष्ट या लोकांना आकर्षित करते. या लोकांचे हृदय देखील स्वच्छ असते. त्यांना फसवणूक कशी करावी हे माहित नसते. ते ज्या व्यक्तीवर प्रेम करतात त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात, ते कधीही वाईट काहीही वागत नाहीत, ज्यामुळे त्यांचे मित्र आणि जवळचे लोक दुखावले जातील.

कोणत्या क्षेत्रात करिअर बनवावे?

अंकशास्त्रानुसार, 24, 15 किंवा 6 तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र हा कला देणारा मानला जातो. जर हे लोक कोणतेही क्रिएटिव्ह काम करतात तर त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त असते. कला, फॅशन, संगीत आणि मॉडेलिंगसारख्या क्षेत्रात करिअर करणे त्यांच्यासाठी चांगले आहे. याशिवाय, हे लोक फूड, क्झरी वस्तू आणि सोने, चांदी किंवा हिऱ्याच्या दागिन्यांशी संबंधित व्यवसाय देखील करू शकतात.

हेही वाचा :                          

Malavya Yog 2025: 26 जुलैपर्यंत 'या' 3 राशी राजासारखं जीवन जगतील! शुक्र भ्रमणामुळे मालव्य राजयोगाची निर्मिती, देवी-लक्ष्मी-कुबेर होणार प्रसन्न

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)