Numerology Mulank 4 :अंकज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तित्वाचा संबंध त्याच्या जन्माची वेळ आणि तारखेशी संबंधित आहे. राशीभविष्यानुसार, अंकशास्त्रात (Numerology) 1 ते 9 अंकाला मूलांक म्हटलं जातं. ज्याप्रमाणे, राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. त्याचप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीचा मूलांक हा त्याच्या जन्मतिथीनुसार असतो. आज आपण अशाच एका मूलांकाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 हा अनेक अर्थांनी खास आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13 आणि 22 तारखेला झाला आहे अशा लोकांचा मूलांक 4 असतो. या मूलांकावर राहुचा प्रभाव आहे. याचा थेट संबंध भगवान सूर्यदेवाशी आहे. या जन्मतारखेच्या लोकांवर सूर्यदेवाची विशेष कृपा असते.
कसा असतो यांचा स्वभाव?
या जन्मतारखेचे लोक लहानपणापासूनच मेहनती असतात. या लोकांना व्यवहार समजून घ्यायला वेळ लागत नाही. कारण, त्यांचं अंकज्ञान फार चांगलं असतं. या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांचं भविष्य फार उज्ज्वल असतं. लहानपणापासूनच यांच्यात स्वार्थीभाव असतो. इतरांकडून आपलं काम काढून घेणं यांना पटकन जमतं. तसेच, या जन्मतारखेचे लोक धनसंपत्तीने समृद्ध असतात. देवी लक्ष्मीची यांच्यावर सतत कृपा असते. मेहनती असल्यामुळे यांना प्रचंड यश मिळतं.
अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांकडे अमाप धनसंपत्ती असल्या कारणाने हे लोक स्वभावाने फार घमंडी असतात. लोकांना भेटणं, त्यांच्याशी संवाद साधणं किंवा कोणत्या प्रकारची मदत करणं यांना अजिबात आवडत नाही. हे लोक फार स्वार्थी स्वभावाचे असतात. या व्यतिरिक्त, जोपर्यंत हे लोक आपलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत यांना लोकांशी संबंध ठेवायला आवडतात.
आपलं रहस्य गुपित ठेवतात
मूलांक 4 असणारे लोक कधीच स्थिर बसत नाहीत. त्यांना सतत काहीना काही करायला आवडतं. सामाजिक आणि धार्मिक कार्यात यांची फार आवड असते. यांना लोकांना आपल्याकडे चांगलं प्रभावित करता येते. तसेच, हे लोक आपल्याविषयी कधीच कोणाला काहीच कळू देत नाही. पर्सनल स्पेस ठेवायला यांना फार आवडतं. हे लोक मित्र फार सहजतेने बनवत नाहीत. पण, जर का एखाद्याशी मैत्री केली तर त्याची साथ शेवटपर्यंत सोडत नाहीत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: