Numerology: प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात खरं प्रेम मिळतेच असं नाही, काही लोक आजही खऱ्या प्रेमाला आसुसलेले असतात, तर काही लोकांच्या कमतरतांमुळे त्यांचे प्रेम त्यांच्यापासून दूर जाते. अनेकदा असे दिसून येते की, काहीवेळा परिस्थिती अशी बनते की, दोन प्रेमी एकत्र राहू शकत नाहीत. सर्व प्रयत्न करूनही त्यांचे नाते तुटते आणि शेवटी ते निराश होतात. अंकशास्त्रानुसार, जन्मतारीख म्हणजेच मूळ क्रमांकाच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या प्रेम जीवनाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. त्यांचे नाते आणि लग्न किती काळ टिकेल हे देखील त्यांना कळू शकते. जाणून घेऊया...
'या' जन्मतारखेच्या लोकांना प्रेमाच्या बाबतीत कमनशिबी मानले जाते!
आज अंकशास्त्राच्या मदतीने आम्ही तुम्हाला त्या तारखांबद्दल सांगणार आहोत ज्या दिवशी जन्मलेल्या लोकांना प्रेमाच्या बाबतीत कमनशिबी मानले जाते. प्रेम मिळाले तरी दाद देत नाही. चला त्या तारखांबद्दल जाणून घेऊया ज्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीला प्रेमात यश मिळण्याची शक्यता कमी असते. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 7, 12, 17 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांना प्रेमात यश मिळण्याची शक्यता कमी असते. अनेक वेळा त्यांच्यातील काही कमतरतांमुळे त्यांचे नाते तुटते.
आनंदी जीवन जगायला आवडते..
अंकशास्त्रानुसार, हे लोक स्वतः आनंदी असतात. ते त्यांच्या जीवनात कोणताही हस्तक्षेप सहन करत नाहीत. ते सहजासहजी लग्न करायलाही तयार नसतात.
पटकन विश्वास ठेवत नाही..
अंकशास्त्रानुसार, हे लोक कोणावरही सहजासहजी विश्वास ठेवत नाहीत. त्यांना लोकांपासून दूर राहायला आवडते. त्यांचे मित्रही खूप कमी आहेत. ते लोकांमध्ये सहज मिसळू शकत नाहीत.
खूप विचार करतात..
अंकशास्त्रानुसार, हे लोक खूप विचार करतात. विशेषत: जेव्हा प्रेमाचा प्रश्न येतो तेव्हा घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. त्यामुळे या वागण्यामुळे नात्यात अनेक वेळा अडचणी वाढू लागतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)