Numerology: आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला झटपट यश हवंय. अशात त्याचा कामाचा ताण देखील वाढत चाललाय. परिणामी नैराश्य आणि चिंतेत देखील वाढ होत आहे. नैराश्यात माणूस नेहमीच दुःखी राहतो आणि कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. तर चिंतेमध्ये भीती आणि अस्वस्थतेची भावना माणसावर वर्चस्व गाजवते. काही लोक अगदी लहान वयातच त्याचे बळी पडतात, तर बरेच लोक स्वतःला इतके तंदुरुस्त आणि निरोगी ठेवतात की हे आजार त्यांना स्पर्शही करत नाहीत. अंकशास्त्रानुसार, अशा काही जन्मतारखा आहेत, ज्या दिवशी जन्मलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी नैराश्य आणि चिंतेचा सामना करावा लागतो. यामागे एक मोठे कारण देखील आहे, अंकशास्त्रानुसार जाणून घ्या..
अंकशास्त्राच्या माध्यमातून भविष्यातील जीवनाबद्दल भाकिते
ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्र हे एक असे शास्त्र आहे ज्यामध्ये अंकांच्या मदतीने व्यक्तीच्या भविष्याबद्दल माहिती दिली जाते. याला अंक शास्त्र म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला न्युमरोजलॉजी म्हणतात. अंकशास्त्रात, गणिताच्या काही नियमांचा वापर करून व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलूंचे मूल्यांकन केले जाते आणि त्यांच्या भविष्यातील जीवनाबद्दल भाकिते केली जातात. अंकशास्त्रात, व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मूळ संख्या शोधून त्याचे भविष्य मोजले जाते.
आयुष्यात नैराश्य आणि चिंतेचा सामना करावा लागतो..
अंकशास्त्राने प्रत्येक संख्येचे फायदे आणि तोटे स्पष्ट केले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही जन्मतारखांबद्दल सांगणार आहोत, ज्या दिवशी जन्मलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात नैराश्य आणि चिंतेचा सामना करावा लागतो. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 20, 11 किंवा 29 तारखेला होतो, त्यांचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 चा स्वामी चंद्र म्हणजेच चंद्र देव असतो. त्यामुळे मूलांक 2 असलेल्या लोकांवर चंद्राचा विशेष प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की, चंद्र हा मनाचा स्वामी आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राची स्थिती कमकुवत असते, त्यांना कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. त्यांना खूप लवकर कंटाळा येतो आणि ते अस्वस्थ होऊ लागतात. अशा परिस्थितीत, अनेक वेळा एखादी व्यक्ती नैराश्य आणि चिंतेचा बळी देखील बनते. म्हणूनच, मूलांक 2 असलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी नैराश्य आणि चिंतेचा सामना करावा लागतो.
मूलांक 2 असलेल्या लोकांचे गुण
- ते मनाने चांगले असतात.
- ते प्रामाणिक आणि निष्ठावान असतात.
- एक आकर्षक व्यक्तिमत्व असते.
- ते स्वतःच्या जगात आनंदी असतात.
चंद्राला बलवान कसे बनवाल?
- भोलेनाथाची पूजा करा.
- सोमवारी नियमितपणे उपवास करा.
- चांदीचे दागिने घाला.
- पांढऱ्या रंगाचे काहीही सोबत ठेवा.
- चंद्रदेवाची पूजा करा आणि त्यांना जल अर्पण करा.
हेही वाचा :