Numerology: या जगात विविध स्वभावाची माणसं वावरतात. कधी ना कधी, तुम्हालाही असे लोक भेटले असतील, ज्यांचा स्वभाव कधी शांत, कधी मस्तीखोर, कधी प्रेमळ तर कधी रागीट.. तर काही लोक त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वांचे आवडते बनतात. काही लोक सहजपणे सर्वांशी मैत्री करतात आणि काही वेळातच त्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण करतात. अंकशास्त्राच्या मदतीने आज आम्ही तुम्हाला अशा तारखांबद्दल सांगणार आहोत, ज्या दिवशी जन्मलेले लोक प्रत्येकाच्या हृदयात सहज स्थान निर्माण करतात. या लोकांचे मन स्वच्छ असते आणि ते लोकांना मदत करण्यास नेहमीच तयार असतात. या लोकांना प्रसिद्धीझोतात राहायला आवडत नाही..
असे लोक प्रत्येकाच्या हृदयात सहज स्थान निर्माण करतात..
अंकशास्त्रानुसार, काही तारखा अशा असतात ज्या दिवशी जन्मलेले लोक प्रत्येकाच्या हृदयात सहज स्थान निर्माण करतात, या लोकांचे मन स्वच्छ असते आणि लोकांना मदत करण्यास नेहमीच तयार असतात. हे लोक अल्पावधीतच इतरांमध्ये मिसळतात आणि त्यांचे विश्वासू बनतात. काही लोकांमध्ये जन्मापासूनच हा गुण असतो. अशा कोणत्या जन्मतारखा आहेत?
प्रसिद्धीच्या झोतात राहणे आवडत नाही..
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला होतो, त्यांचा मूळ अंक 5 असतो. 5 अंक असलेल्या लोकांचा स्वभाव खूप चांगला असतो. ते सहज सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण करतात. या लोकांना प्रसिद्धीच्या झोतात राहणे आवडत नाही. ते स्वतःच्या कामात लक्ष देतात आणि कोणाच्याही आयुष्यात जास्त हस्तक्षेप करत नाहीत. पण ते ज्या व्यक्तीशी मैत्री करतात त्याच्यासोबत अगदी कठीण काळातही उभे राहतात. 5 मूलांकाच्या लोकांचे मन तेजस्वी असते आणि त्यांची संवाद शक्ती खूप मजबूत असते. ते कोणतेही काम पूर्ण मनाने करतात, त्यात त्यांना निश्चितच यश मिळते.
कोणत्या क्षेत्रात करिअर उत्तम ठरेल?
मूलांक 5 अंक असलेल्या लोकांनी स्वतःचा व्यवसाय नक्कीच सुरू करावा.5 क्रमांकाच्या लोकांसाठी संशोधन कार्य करणे देखील चांगले आहे.त्यांना मार्केटिंग क्षेत्रातही यश मिळण्याची शक्यता आहे.5 अंक असलेले लोक अध्यापन, लेखापाल किंवा जनसंपर्क क्षेत्रातही हात आजमावू शकतात.
जीवनात यशस्वी होण्याचे मार्ग
5 अंक असलेल्या लोकांनी गणपतीची पूजा करावी. त्यांना याचा विशेष फायदा होतो.जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमीच आनंद टिकून राहायचा असेल, तर गाईला नियमितपणे हिरवा चारा खायला द्या.5 अंक असलेल्या लोकांसाठी हिरवे कपडे घालणे शुभ असते.
हेही वाचा:
Shani Transit: खूप सोसलं, आता होणार चांगभल! 2025 च्या शेवटी शनिदेव 'या' 3 राशींवर होणार मेहेरबान, सोन्याचे दिवस येणार...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)