Numerology: एखाद्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम करणं आणि कोणीतरी आपल्यावर प्रेम करणं ही एक अत्यंत सुंदर भावना असते. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी प्रेमात पडायचं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी जोडीदार असा असतो, जो त्याला वाईट आणि चांगल्या काळात साथ देतो. मात्र प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर काहींना खरे प्रेम मिळते, तर काहींना आयुष्यभर प्रेमासाठी तळमळावे लागते. अंकशास्त्राच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की, प्रत्येक व्यक्तीला जीवनात खरे प्रेम मिळेल किंवा नाही हे आधीच समजू शकते. प्रेम आणि रोमान्सच्या बाबतीत कोणत्या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागेल याची माहिती देखील मिळू शकते.
'हे' लोक प्रेमाच्या बाबतीत कमनशिबी मानले जातात
आज अंकशास्त्राच्या मदतीने आम्ही तुम्हाला त्या जन्मतारीखांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या प्रेमाच्या बाबतीत कमनशिबी मानले जातात. हे लोक रोमँटिक असतात आणि आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, परंतु तरीही त्यांना प्रेमात यश मिळत नाही.
कोणत्या लोकांना खरं प्रेम मिळत नाही?
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळ क्रमांक 7 असतो. हे लोक खूप भाग्यवान असतात, परंतु प्रेमाच्या बाबतीत त्यांना प्रत्येक वेळी पराभवाला सामोरे जावे लागते. प्रेमाच्या बाबतीत हे लोक अशुभ असतात. हे लोक खूप रोमँटिक आणि इमोशनल असतात, जे आपल्या पार्टनरला खुश ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. पण शेवटी त्यांच्या पदरी निराशाच पडते. अंकशास्त्रात म्हटलंय... जरी त्यांना त्यांचे खरे प्रेम सापडले तरी त्यांच्या प्रेम जीवनात नेहमीच समस्या असतात. हे लोक कधीच सुखी नसतात. जोडीदाराशी ताळमेळ राखण्यात त्यांना खूप अडचणी येतात.
कोणते लोक प्रेमात फसतात?
अंकशास्त्र सांगते की, कोणत्याही महिन्याच्या 2, 4, 6, 8, 11, 13, 15, 17, 20, 22, 24, 27, 29 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक मनाने शुद्ध आणि भाग्यवान असतात. हे लोक आपलं नातं वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, पण तरीही त्यांच्या लव्ह लाईफमध्ये कधीही शांतता येत नाही. सहसा हे लोक प्रेमात फसवणूक करतात.
हेही वाचा>>>
Numerology: वैवाहिक जीवन उत्तम जगतात, 'या' जन्मतारखेचे लोक कोणालाही रहस्य सांगत नाहीत! अंकशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )