Continues below advertisement

Numerology: तारुण्यात आलं की वेध लागतात लग्नाचे. तेव्हा गरज असते एका जोडीदाराची, जो आपल्या सुख-दु:खात साथ देईल, अनेकजण त्यांच्या स्वप्नांचा राजकुमार किंवा राजकुमारी (Numerology) मिळावी यासाठी बहुतेकदा देवाला नवस करतात. मात्र अंकशास्त्रानुसार पाहायला गेल्यास, आज आम्ही तुम्हाला अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल सांगणार आहोत, ज्या लोकांच्या नशीबी सुंदर जोडीदार ठरलेलाच असतो.

'या' जन्मतारखेच्या लोकांच्या नशीबी सुंदर जोडीदार ठरलेलाच..

अंकशास्त्रात, मूलांक किंवा जन्म क्रमांक (Mulank) हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा आरसा मानला जातो. एखाद्या व्यक्तीचा मूलांक क्रमांक त्यांच्या जन्मतारखेवरून घेतला जातो. हे त्यांचे व्यक्तिमत्व, जीवनशैली, भविष्य आणि वैवाहिक जीवन प्रकट करू शकते. प्रत्येक मूलांक क्रमांकाचा स्वतःचा प्रभाव असतो आणि जीवनसाथी सुंदर असेल की नाही हे यावर अवलंबून असते. अंकशास्त्रानुसार, जाणून घेऊया कोणत्या मूलांक संख्या असलेल्या मुलांना सुंदर बायका मिळू शकतात!

Continues below advertisement

या जन्मतारखेचे तरुण भाग्यवान!

अंकशास्त्रानुसार मूलांक क्रमांक 1 असलेल्या मुलांना, म्हणजेच 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्यांना नेहमीच आकर्षक आणि बुद्धिमान बायका मिळतात. 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्यांच्या बायका सौम्य आणि सुंदर असतात. 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या तरुणांच्या पत्नी सौम्य आणि सुंदर असतात. 3, 6 आणि 24 तारखेला जन्मलेल्या पुरुषांना 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्यांना आकर्षक आणि उत्साही बायका मानल्या जातात. त्यांना सुंदर पत्नी मिळण्याची शक्यता असते.

या जन्मतारखेच्या तरूणी म्हणजे लग्नासाठी हिरवा सिग्नल

अंकशास्त्रानुसार आजच्या जगात, तरुण उत्तम जोडीदार शोधतात. 2, 3, 4 आणि 6 तारखेला जन्मलेल्या मुली विवाहासाठी उत्तम असतात. या महिला त्यांच्या जोडीदारासाठी काहीही करण्यास तयार असतात. या क्रमांकाच्या महिला शेवटपर्यंत त्यांच्या जोडीदाराच्या पाठीशी उभ्या राहतात.

या जन्मतारखेचे तरुण म्हणजे लग्नासाठी हिरवा सिग्नल

अंकशास्त्रानुसार 2 मूलांकाचे तरुण त्यांच्या जोडीदाराच्या भावनांची काळजी घेतात. या मूलांकाचे तरुण 2, 11, 20 आणि 29 जन्मतारखेचे असतात. ते मजबूत आणि भावनिकदृष्ट्या उत्साही नातेसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या मुलांना त्यांच्या जोडीदाराच्या प्रत्येक सवयी आवडतात आणि त्यांच्यासाठी काहीही करण्यास तयार असतात.

हेही वाचा :           

Dussehra 2025: 5 दिवस बाकी! दसऱ्यापासून 'या' 3 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल सुरू, मंगळ-बुधाची युती नशीब पालटणार, नोकरीत प्रमोशन, पैसाच पैसा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)