Numerology: आपण आपल्या सभोवताली विविध प्रकारच्या स्वभावाची लोक पाहतो, काही लोक प्रेमळ असतात, काही लोक रागीट असतात. तर काही लोकांना तर चक्क  त्यांची स्तुती ऐकायला आवडते. तर काही लोकांचे कार्य चांगले असूनही त्यांना त्यांचे कौतुक केलेले आवडत नाही. अंकशास्त्रानुसार आज अशा काही जन्मतारखेच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत,जे लोक स्वतःची स्तुती करताना थकत नाहीत, जिथे जातात तिथे स्वतःची स्तुती करायला लागतात. अंकशास्त्रात म्हटलंय...

असे लोक लक्ष वेधून घेणारे असतात...

अंकशास्त्रानुसार, बहुतेक लोकांमध्ये असे गुण असतात की लोक त्यांची मनापासून प्रशंसा करतात. मात्र काही लोक इतर लोकांची मुद्दाम खोटी स्तुती करतात जेणेकरून त्यांनाही त्यांच्याकडून स्तुती ऐकायला मिळेल. सोप्या शब्दांत सांगायचे तर, असे लोक लक्ष वेधून घेणारे असतात. या लोकांना त्यांची स्तुती आणि कौतुक ऐकायला आवडते. अनेक वेळा लोक त्यांच्या या सवयीमुळे चिडतात. अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख त्याच्यातील गुण आणि कमकुवतपणा प्रकट करते. काही जन्मतारखेचे लोक त्यांच्या गुणांमुळे लक्ष वेधून घेतात तर काही लोकांना इतर लोकांकडून त्यांची खोटी स्तुती ऐकायला आवडते. तर कधी कधी अशी वेळ येते, जेव्हा ते प्रसिद्धीच्या झोतात ते कधीकधी इतरांच्या भावना दुखावतात.

परफेक्ट दिसण्याचा पुरेपूर प्रयत्न

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळ अंक 1 असतो. 1 क्रमांकाचे लोक लक्ष वेधून घेणारे असतात. ते सर्वत्र स्वतःची स्तुती करतात आणि स्वतःला सर्वोत्तम म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतात. ते जिथे जातात तिथे स्वतःची स्तुती करू लागतात. 1 क्रमांकाच्या लोकांना आयुष्यात सर्व काही खूप लवकर हवे असते. या लोकांमध्ये संयम नसतो, त्यामुळे ते चुकीचे निर्णय देखील घेतात.

या लोकांनी कोणत्या क्षेत्रात करिअर करावे?

अंकशास्त्रानुसार, मूलांक 1 अंक असलेले लोक राजकारण किंवा कला क्षेत्रात करिअर करू शकतात. याशिवाय, हे लोक स्वतःचा व्यवसाय देखील करू शकतात. जर त्यांनी व्यवसाय पुढे नेण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली तर त्यांना कमी वेळात यश मिळते.

भाग्यवान रंग कोणता?

अंकशास्त्रानुसार, सूर्य देवाला 1 अंक असलेल्या लोकांचा स्वामी मानले जाते. म्हणून, या लोकांनी सूर्य ग्रहाशी संबंधित रंग परिधान करावेत. पिवळा, लाल आणि नारंगी रंग त्यांच्यासाठी भाग्यवान असतात.

यश मिळवण्यासाठी काय करावे?

  • अंकशास्त्रानुसार, अंक 1 असलेल्या लोकांना यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी सूर्य देवाची पूजा करावी. 
  • तसेच सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा.
  • 1 क्रमांकाच्या लोकांसाठी गायत्री मंत्राचा जप करणे चांगले आहे.
  • 1 अंक असलेल्या लोकांनी घरात मनी प्लांट लावावा आणि त्याची नियमित काळजी घ्यावी. 
  • यामुळे तुम्हाला नक्कीच यश आणि संपत्ती मिळेल. 

हेही वाचा :

Shani Dev: तब्बल 27 वर्षांनंतर शनिदेव पुन्हा एक्शन मोडमध्ये! 'या' 3 राशींचं होणार चांगभलं, शनिच्या नक्षत्र बदलाने होणार सर्व मंगलमय

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)