Shani Margi 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी लवकरच मार्गी (Shani Margi) चाल चालणार आहे. शनी मीन राशीत आपली चाल बदलणार आहे. त्यानुसार, 28 नोव्हेंबर 2025 पासून शनी मीन राशीत मार्गी होणार आहे. तर, पुढच्या सहा महिन्यांपर्यंत शनी मार्गी चाल चालणार आहे. शनी 27 जुलै 2027 रोजी शनी पुन्हा आपली चाल बदलून वक्री होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनीच्या चालीचा व्यक्तीच्या जीवनावर फार खोलवर परिणाम होतो. आता शनी सरळ चाल चालणार आहे. शनी पुढचे सहा महिने 5 राशींचं भाग्य उजळणार आहे. शनीच्या मार्गी चालीने कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनीच्या मार्गी चालीने वृषभ राशीच्या मान-सन्मानात वाढ झालेली दिसेल. त्याचबरोबर, तुमची रखडलेली कामे लवकरात लवकर मार्गी लागतील. तुमचा दृष्टीकोन पूर्वीपेक्षा चांगला राहील. तसेच, या काळात तुमचे नवीन मित्र बनतील. समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींशी तुमची ओळख होईल. व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनीच्या मार्गी चालीमुळे हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे. समाजात परिवर्तन घडवून आणण्यात तुमचा हातभार लागेल. तसेच, नशिबाची साथ तुमच्या बरोबर असणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. बुद्धीचा चांगला विकास होईल. तसेच, मित्रांच्या सहकार्याने तुमची कामे पूर्ण करता येतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी शनिच्या मार्गी चालीचा सकारात्मक परिणाम होताना दिसणार आहे. समाजातील काही उच्च अधिकाऱ्यांशी तुमच्या भेटीगाठी होतील. जर तुम्हाला नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर तुमच्यासाठी हा काळ फार शुभ असणार आहे. मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी शनीची मार्गी चाल शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल घडताना दिसतील. पार्टनरबरोबर तुमचा व्यवहार चांगला असेल. तसेच, नशिबाची साथ तुमच्या बरोबर असल्या कारणाने तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी शनीची मार्गी चाल लाभदायी ठरणार आहे. तुमच्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :