November Panchak 2022 : हिंदू धर्मात सर्व कामे शुभ मुहूर्तावरच केली जावी असे मानले जाते. यासाठी लोक पंचांगाची मदत घेतात. प्रत्येक महिन्यात असे पाच दिवस असतात ज्यामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये. पंचांगातील या पाच दिवसांना पंचक म्हणतात.
पंचक योग कधी तयार होतो ?
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र जेव्हा कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा त्या योगाला पंचक योग म्हणतात. व्यवहारात पंचक म्हणजे पुनरावृत्ती. म्हणजेच पंचक योगाची घटना ही त्याचीच पुनरावृत्ती आहे. असे मानले जाते की पंचक दरम्यान एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबात या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. या पंचकचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पंचक शांतीची पूजा केली जाते. वैदिक पंचांगानुसार नोव्हेंबर महिन्यातील पंचक 7 नोव्हेंबर 2022 रोजी सोमवारी सकाळी 00.04 वाजता समाप्त होईल. 2 नोव्हेंबर 2022 रोजी बुधवारी हे पंचक सुरू झाले होते.
नोव्हेंबरमीळ पंचक तारखा
पंचक नोव्हेंबरमध्ये 2 तारखेला दुपारी 02:16 वाजता सुरू झाले. ते 7 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 00:04 पर्यंत असेल.
हिंदू धर्मग्रंथांनुसार पंचकांचे पाच प्रकार आहेत.
राज पंचक : सोमवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना रोग पंचक म्हणतात.
अग्नि पंचक : मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना अग्नि पंचक म्हणतात.
चोर पंचक : शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकांना चोर पंचक म्हणतात.
मृत्यु पंचक : शनिवारी सुरू होणाऱ्या पंचकला मृत्यु पंचक म्हणतात .
रोग पंचक : रविवारी सुरू होणाऱ्या पंचकांना रोग पंचक म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या