Nirjala Ekadashi 2025 : हिंदू पंचांगानुसार, निर्जला एकादशी (Nirjala Ekadashi) 6 जून रोजी म्हणजेच उद्या साजरी केली जाणार आहे. वर्षातून येणाऱ्या एकादशी तिथीमधली निर्जला एकादशी तिथी सर्वात महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या उपवासाचे नियमही काहीसे कठीण असतात. या दिवशी तुम्ही निर्जल उपवास न ठेवताही काही छोटे-मोठे उपाय करु शकता. हे उपाय नेमके कोणते ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
या दिवशी भगवान विष्णूला लाल रंगाची फुलं अर्पण करा. तसेच, लाल रंगाच्या खाद्यपदार्थांचं दान करा. यामुळे सुखसमृद्धीत वाढ होईल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला तुळशीची पानं अर्पण करा. ही पानं एक दिवस आधीच तोडून घ्या. यामुळे भौतिक सुख-सुविधांचा लाभ मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी. तसेच, गायीला हिरवा चारा खाऊ घालावा. यामुळे तुम्हाला चांगले लाभ मिळतील.
कर्क रास (Cancer Horoscope)
या राशीच्या लोकांनी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला खीरचा नैवेद्य दाखवावा. यामुळे तुमच्या धनधान्यात चांगली वाढ होईल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्रं परिधान करावीत. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची मिठाई दान करावी.
कन्या रास (Virgo Horoscope)
या राशीच्या लोकांनी जल दान करावे. यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील.
तूळ रास (Libra Horoscope)
शुक्र ग्रहाच्या या राशीने भगवान विष्णूला पांढऱ्या रंगाची फुलं आणि बर्फी अर्पण करावी.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
या राशीने लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. तसेच, गूळ आणि चणे दान करावेत.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांनी या दिवशी गुरुची भेट घ्यावी. त्याचबरोबर पिवळ्या रंगाचे कपडे दान करावेत.
मकर रास (Capricorn Horoscope)
या दिवशी भगवान विष्णूला दही किंवा दूर अर्पण करा. त्याचबरोबर जलदान करणं देखील लाभदायी ठरेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
या राशीने जनावरांना अन्नदान करणं लाभदायी ठरेल. त्याचबरोबर भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा.
मीन रास (Pisces Horoscope)
या दिवशी मीन राशीच्या लोकांनी गरजूंची मदत करावी. तसेच, केळी आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करणं शुभ ठरेल.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)