Nirjala Ekadashi 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 6 जून रोजी निर्जला एकादशी (Nirjala Ekadashi) साजरी केली जाणार आहे. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी भद्र राजयोगाचा शुभ संयोगदेखील जुळून येणार आहे.
भद्र राजयोगाच्या शुभ प्रभावाने वृषभ आणि कन्यासह 5 राशींना लाभ मिळणार आहे. या राशीच्या नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तसेच, तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, कोणताही निर्णय घेताना काळजी घ्या. तसेच, जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. मानसिक तणाव कमी होईल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं संक्रमण फार लाभदायी ठरेल. या राशीच्या लग्न भावात हे संक्रमण होणार आहे. बुध ग्रहाच्या युतीने तुमची निर्णय क्षमता दिसून येईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींचा तुम्हाला आशीर्वाद लाभेल. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि लाभदायी असणार आहे. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच, व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन योजना आखाल. पार्टनरबरोबर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या संक्रमणाने तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तसेच, तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तुमची निर्णय घेण्याची क्षमता दिसून येईल. समाजात तुमची प्रतिष्ठा टिकून राहील. या संक्रमणामुळे नवीन नोकरी देखील मिळू शकते.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं संक्रमण फार भाग्याचं ठरेल. या काळात तुमच्या शत्रूवर तुम्हाला नजर ठेवता येईल. तसेच, भगवान विष्णूची तुमच्यावर सदैव कृपा असेल. त्यामुळे तुमच्यावर कोणतंच आर्थिक संकट ओढावणार नाही. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला जास्त आर्थिक लाभ मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)