Shukra-Mangal Yuti 2026 : द्रिक पंचांगानुसार, नवीन वर्षाची सुरुवात होताच जानेवारी महिन्यात शुक्र-मंगळ ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत. ज्योतिष शास्त्रात या दोन्ही ग्रहांचे स्वभाव एकमेकांपासून फार विपरीत मानले जातात. यासाठीच हे दोन्ही ग्रह जेव्हा जवळ असतात. तेव्हा शुक्र-मंगळ ग्रहाची युद्धजन्य परिस्थिती म्हणतात. 

पंचांगानुसार, ग्रहांची ही अशुभ युती 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजून 19 मिनिटांपासून सुरु होणार आहे. ग्रहांची ही स्थिती जवळपास चार दिवस असते. तसेच, 10 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजून 13 मिनिटांनी समाप्त होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा ग्रहांमध्ये युद्धासारखी स्थिती निर्माण होते तेव्हा ज्या राशींचा स्वामी ग्रह हे ग्रह आहेत त्या राशींवर होतो. त्यामुळे शुक्र-मंगळ ग्रह युद्धाच्या दरम्यान कोणकोणत्या राशींना सावध राहण्याची गरज आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे या युतीचा सर्वात जास्त परिणाम मेष राशीवर होणार आहे. या दरम्यान तुमचा रागावर कंट्रोल नसणार आहे. तसेच, या काळात तुम्ही काही निर्णय काहीही विचार न करता घेऊ शकता. कामाच्या ठिकाणी घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांमुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या आरोग्याची तुम्हाला सर्वात जास्त काळजी घ्यावी लागेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

शुक्र-मंगळ ग्रहाची स्थिती वृषभ राशीसाठी प्रेम जीवनात आणि तुमच्या कुटुंबात तणाव आणण्याची शक्यता आहे. या काळात छोट्या छोट्या गोष्टींवरुन तुमच्यात मतभेद निर्माण होऊ शकतात. तसेच, तुम्हाला पैशांच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करुन चालणार नाही. अन्यथा तुमच्या खर्चात वाढ होईल. 

तूळ रास (Libra Horoscope)

शुक्र-मंगळ ग्रहाची ही युती तूळ राशीच्या लोकांसाठी मानसिक तणाव निर्माण करणारी आहे. नात्यांमध्ये अनेक गैरसमज निर्माण होतील. तसेच, तुमचं मन अशांत राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सतत तणाव जाणवू शकतो. त्यामुळे या काळात संयम बाळगणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

या काळात तुम्ही तुमच्या रागावर आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुमच्या कामात वेगवेगळ्या कारणांमुळे व्यत्यय निर्माण होऊ शकतो. तुमच्या अपेक्षेप्रमाणे रिझल्ट्स न मिळाल्यामुळे तुमचा संताप होईल. आरोग्याच्या बाबतीत देखील तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. 

हे ही वाचा :                             

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला 1, 2 नाही तर तब्बल 4 ग्रहांचं बॅक टू बॅक संक्रमण; वर्षाच्या सुरुवातीलाच 'या' राशींची होणार छप्परफाड कमाई