Yearly Horoscope 2024 : नवीन वर्ष (New Year 2024) सुरू होण्यासाठी अवघे काही महिने उरले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, 2024 हे वर्ष काही राशींसाठी खूप शुभ तर काही राशींसाठी अशुभ परिणाम घेऊन आले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार येणारे वर्ष अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात समस्यांनी ग्रासले जाणार आहे. 2024 मध्ये या राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी?



वृषभ
वृषभ राशीभविष्य 2024 नुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी वर्ष 2024 ची सुरुवात चांगली जाणार नाही. पुढील वर्षी तुमचे खर्च झपाट्याने वाढतील. या राशीच्या लोकांनी 1 मे 2024 पर्यंत आग आणि धारदार शस्त्रांपासून सावध राहणे आवश्यक आहे, अन्यथा तुमच्यासोबत मोठी दुर्घटना घडू शकते. 1 मे नंतर गुरु ग्रह तुमच्या राशीत येईल. मग तुमच्या समस्या हळूहळू कमी होतील.


 


प्रेम संबंधांमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
2024 मध्ये वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कर्मदाता ग्रह शनी वर्षभर दशम भावात असल्यामुळे तुम्ही खूप मेहनत कराल. या वर्षी तुम्हाला भाग्याची साथ थोडी कमी मिळेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. राहूमुळे तुमच्या जीवनात चढ-उतार येतील. प्रेम संबंधांमध्ये तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.



मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना 2024 मध्ये बुध आणि शुक्रामुळे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कामाच्या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. या वर्षी तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट घेणे टाळावे. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना सुरुवातीला काही समस्यांना सामोरे जावे लागेल. केतूमुळे कौटुंबिक समस्या वाढू शकतात. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो.



धनु
वार्षिक राशीभविष्य 2024 नुसार धनु राशीच्या लोकांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या वर्षी तुम्ही वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही मोठ्या अपघाताला बळी पडू शकता. रागाच्या भरात काहीही बोलणे किंवा वागणे टाळावे. धनु राशीच्या लोकांना कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल.


 


प्रेमसंबंधांमध्येही चढ-उतार 
2024 मध्ये धनु राशीच्या लोकांच्या व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो. तुमच्या प्रेमसंबंधांमध्येही चढ-उतार असू शकतात. या वर्षी तुमचे नशीब थोडे कमजोर राहील. गुरू तुमच्या सहाव्या भावात प्रवेश करत असल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. तुम्हाला सर्वच क्षेत्रात चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. राहू-केतूमुळे वर्षभर करिअरमध्ये अडचणी येतील. काही कठीण प्रसंग तुमच्या वाट्याला येऊ शकतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Yearly Horoscope 2024 : नववर्ष 2024 मध्ये 'या' राशींचे भाग्य चमकेल, देवी लक्ष्मीची असेल कृपा, जाणून घ्या