New Year 2024 : नवीन वर्ष 2024 (New Year 2024) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर ज्योतिषशास्त्रात असे अनेक छोटे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमच्या घराची भरभराट होईल. घरात लक्ष्मी नांदेल. यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांपैकी एक उपाय म्हणजे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरासाठी काही वस्तू खरेदी (Things to buy in New Year) करणे.


नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी घरी आणल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी घरी आणल्याने कोणते फायदे मिळतात, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


घरी मोराची पिसे आणा


नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी, म्हणजेच 2024 च्या आधी मोराची पिसे नक्कीच खरेदी करा आणि घरी आणा. मोराचे पंख घरातील नकारात्मकता दूर करतात आणि मोरपंख श्रीकृष्णाचे आवडते देखील मानले जाते. हे घरी आणल्याने श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद वर्षभर तुमच्यावर राहील. 


घरी तुळस आणा


नवीन वर्ष, म्हणजेच 2024 च्या सुरुवातीपूर्वी घरात तुळशीचे रोप नक्की आणा. जर तुळशी रोप आधीच घरात असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तिला गंगाजलाने शुद्ध करा. घरात तुळशीचे रोप असल्यास आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. घरी तुळशीचे रोप असणे फार शुभ मानले जाते. हिंदु धर्मात तुळशीच्या रोपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.


घरी तांबे किंवा पितळ्याचा एक कासव आणा


कासव हे माता लक्ष्मीचे प्रतीक आणि भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. तांबे किंवा पितळ धातूपासून बनवलेले कासव घरी आणल्याने नवीन वर्ष सुख-समृद्धीत घेऊन जाते आणि श्री हरी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद घरावर राहतो. कर्जासारख्या समस्या दूर होऊ लागतात.


घरी शंख-शिंपले आणा


शंख हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. हे नकारात्मकता दूर करण्याचे काम करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणते, त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरामध्ये शंख स्थापित करा. यामुळे घरातील वातावरण शुद्ध होईल आणि शांतता कायम राहील.  


त्रिशूळ आणा


आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात त्रिशूळ अवश्य आणा. या दिवशी भगवान शिव आणि त्यांच्या शस्त्राची विधीपूर्वक पूजा करा. असे मानले जाते की, घरात त्रिशूळ ठेवल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते. तसेच घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो. त्रिशूश हे शक्तीचे प्रतिक आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Rahu Transit : नवीन वर्षात मायावी ग्रह राहू करणार मीन राशीत भ्रमण; 'या' 3 राशींच्या संपत्तीत होणार वाढ, मिळणार अपार लाभ