New Year 2023 Astrology : नवीन वर्ष (New Year) लवकरच सुरू होणार आहे. 2023 अवघ्या काही दिवसांत सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्ष आपल्यासाठी आनंदाचे यावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. येणारे वर्ष मागील वर्षापेक्षा चांगले जावे यासाठी लोकंही मेहनत घेतात. अनेक लोकं नवीन वर्षापासून आयुष्यात चांगल्या सवयी अंगीकारून वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करतात. याशिवाय ते आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक योजनाही बनवतात. जर तुम्हीही नवीन वर्ष चांगले करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ज्योतिषाचे काही नियम पाळा. ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की, घरात कचरा-घाण असेल तर देवी लक्ष्मी येत नाही. अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी या गोष्टी घरातून काढून टाका. चला जाणून घ्या त्या गोष्टींबद्दल...
2023 हे वर्ष लवकरच सुरू होणार आहे. येणारे वर्ष त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो हीच प्रत्येकाची इच्छा असते. नवीन वर्षात लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी लोक विविध उपाय करतात.
बंद घड्याळ
तुमच्या घरात तुटलेले, बंद पडलेले घड्याळ असेल, तर नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ते घरातून काढून टाका. घरात बंद घड्याळ ठेवणे शुभ मानले जात नाही. बंद घड्याळ बंद भाग्य दर्शवते.
चप्पल
जुने किंवा तुटलेले शूज आणि चप्पल घरात पडून असतील, तर नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी ते घराबाहेर काढा. ज्योतिषशास्त्रानुसार या गोष्टी घरामध्ये दारिद्र्य आणतात.
तुटलेले फर्निचर
तुटलेले फर्निचर देखील शुभ मानले जात नाही. अशा परिस्थितीत घरामध्ये टेबल, सोफा, खुर्ची असे एखादे तुटलेले फर्निचर असेल तर ते नवीन वर्षाच्या आधी घराबाहेर काढा.
देवाच्या तुटलेल्या मूर्ती
घरात कोणत्याही देवी-देवतेची तुटलेली मूर्ती, फाटलेली चित्रे ठेवली असतील तर तीही काढून टाकावीत. अशा मूर्ती अशुभ घडवतात. नवीन वर्षापूर्वी मंदिरात देवाची नवीन मूर्ती घरात स्थापित करा.
जुन्या आणि निरुपयोगी गोष्टी
जुन्या आणि निरुपयोगी गोष्टी घरात ठेवणे योग्य नाही. या गोष्टींमुळे धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होऊन घरातून निघून जाते. अशा परिस्थितीत नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुमची स्टोअर रूम स्वच्छ करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या