Neem Karoli Baba : नीम करोली बाबा हे एक असे महान संत होते की ज्यांचे भक्त फक्त भारतातच नाहीत तर भारताबाहेर देखील आहेत. नीम करोली बाबा यांना भगवान हनुमानाचा अवतार मानलं जातं. त्यांच्या चमत्कारांची गोष्ट तर प्रत्येकाला माहीत आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात मानवाच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आजही वर्तमानात लागू होतात. 

या ठिकाणीसुद्धा आपण नीम करोली बाबा यांच्या अशा काही शुभ संकेतांविषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचे चांगले दिवस येणार आहेत की नाही ते कळू शकेल. 

साधू-संतांचं दर्शन होणं 

जर तुम्हाला अचानक साधू-संतांना भेटण्याची संधी मिळाली किंवा अगदी रस्त्यात त्यांचं दर्शन झालं तर हा एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो. असं म्हणतात की, संतांच्या दर्शनाने आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतात. 

स्वप्नात पूर्वज दिसणे 

नीम करोली बाबांच्या म्हणण्यांनुसार, जर तुम्हाला स्वप्नात पूर्वज दिसले. विशेषत: आशीर्वाद देताना तर हा तुमच्यासाठी फार शुभ संकेत आहे. याचा अर्थ ते तुमच्यावर प्रसन्न आहेत. 

पूजेच्या वेळी डोळ्यांतून पाणी येणं

जर पूजा करताना तुम्ही भावूक झालात आणि तुमच्या डोळ्यांतून अश्रू आले तर हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे. याचा अर्थ तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचतेय आणि ते लवकरच तुमची इच्छा पूर्ण करतील. 

मन हलकं वाटणं 

जर तुमच्या मनात काही जड गोष्ट दडून  असेल आणि अचानक जर तुम्हाला मन हलकं झाल्यासारखं वाटत असेल तर हा शुभ संकेत आहे. नीम करोली बाबा यांच्या म्हणण्यांनुसार, जेव्हा देवाला कोणाची मदत करायची असेल तेव्हा ते आपल्या भक्ताला योग्य मार्ग दाखवतात. 

घराच्या आजूबाजूला पक्ष्यांचं येणं 

जर तुमच्या घराच्या आजूबाजूला अचानक पक्षी किंवा प्राणी जास्त येऊ लागले तर हा शुभ संकेत आहे. विशेष करुन गाय, कुत्रा, कबूतर किंवा पोपट आल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहेत असा संकेत मिळतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                       

Shani Dev 2025 : एप्रिल महिन्यात 'या' 3 राशींची होणार चांदी! शनीचा मीन राशीत होतोय उदय, मिळणार बक्कळ पैसा, यश पदरात पडणार