Navpancham Rajyog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ (Mars) ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हणतात. हा ग्रह फार शक्तिशाली मानला जातो. मंगळ ग्रहाला एका राशीतून (Zodiac Signs) दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी जवळपास 45 दिवसांचा कालावधी लागतो. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. त्याचबरोबर, मंगळ ग्रहाची कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर युती पाहायला मिळते. त्याचप्रमाणे, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी मंगळ आणि वरुण ग्रह मिळून नवपंचम राजयोग जुळून येणार आहे. 


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 13 जानेवारी रोजी सकाळी 2 वाजून 37 मिनिटांनी मंगळ आणि वरुण ग्रह एकमेकांच्या 120 अंशांवर असतील. यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे अनेक राशींच्या लोकांना लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


कर्क रास (Cancer Horoscope)


मंगळ आणि वरुण ग्रहामुळे जुळून येणारा राजयोग कर्क राशीच्या लोकांसाठी फार लाबदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमचा प्रत्येक क्षेत्रात विकास होईल. तुमचा कल आध्यात्माच्या दिशेने असेल. त्याचबरोबर समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीच्या अनेक संधी मिळतील. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग फार चांगला ठरणार आहे. या काळात तुमच्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील. तसेच, तुमच्या करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. त्याचबरोबर तुमची लव्ह लाईफ देखील चांगली राहील. तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग फरा लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. लवकरच तुमचा धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीच्या अनेक संधी मिळतील. तसेच, बिझनेसमध्ये तुम्हाला चांगला नफा मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                         


Shani Gochar 2025 : होळीनंतर 'या' 3 राशींवर असणार शनीची कृपा; नोकरी, व्यवसायात मिळणार भरघोस यश, आरोग्यही ठणठणीत