Narak chaturdashi 2023 : हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण म्हणजे दिवाळी (Diwali 2023). धनत्रयोदशीपासून (Vasubaras) दिवाळी सणाला सुरूवात होत असते. दिवाळीत अभ्यंग स्नानाला (Abhyanga Snan) विशेष महत्त्व असतं, या दिवशी मनाला प्रसन्न करणारं सुगंधी उटणं लावून अंघोळ केली जाते. अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे. नरकचतुर्दशीच्या (Narak Chaturdashi 2023) दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केला जातो. अभ्यांग स्नानाला पहिली अंघोळ देखील म्हणतात. यंदा दिवाळीची पहिली अंघोळ 12 नोव्हेंबरला आहे.  


कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. पंचांगानुसार, सूर्योदयापूर्वी चतुर्दशी तिथी असते आणि सूर्यास्तानंतर अमावस्या तिथी असते. यावर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकाच दिवशी आलं आहे. यंदा या दोन्ही तिथी 12 नोव्हेंबरला, रविवारी साजऱ्या केल्या जाणार आहेत. या दिवशी केल्या जाणाऱ्या अभ्यंग स्नानाचं महत्त्व जोतिषी पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया.


अभ्यंग स्नानाचं महत्व


नरक चतुर्दशीचा दिवस मृत्यूचा देव यमराजाला समर्पित मानला जातो. या दिवशी अभ्यंगस्नान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, जे लोक या विशेष दिवशी अभ्यंग स्नान करतात ते नरकात जाणं टाळू शकतात, तसंच त्याना मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्ती होते. अभ्यंगस्नान हे केवळ धार्मिक दृष्टीकोनातूनच महत्त्वाचं नव्हे, तर याचे अनेक शारीरिक फायदेही होतात.


अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त


उदय तिथीनुसार, अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त 12 नोव्हेंबरला पहाटे 5:28 ते 6:41 पर्यंत असेल.


अभ्यंग स्नान पद्धत


शास्त्रानुसार, नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी अंगाला मुलतानी माती लावून स्नान करण्याच्या प्रक्रियेला अभ्यंगस्नान म्हणतात. ज्यामध्ये हळद, दही, तिळाचे तेल, बेसन, चंदन आणि औषधी वनस्पती लावल्या जातात. या पेस्टने संपूर्ण शरीराची मालिश केली जाते. या उटणामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास देखील मदत होते.


कोणतेही दुष्परिणाम नाहीत


जेव्हा तुम्ही केमिकलयुक्त क्रीम आणि उत्पादनं वापरता, तेव्हा त्वचेवर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात आणि त्वचेचं नुकसान होण्याची भीती नेहमीच असते. बर्‍याचहा ही उत्पादनं त्वरित चमक देतात, परंतु भविष्यात त्वचेची हानी देखील होऊ शकते. त्याच वेळी उटणं हे नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं आहे, ज्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, त्यामुळे उटण्याच्या वापर करून तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Diwali 2023: दिवाळीच्या सकाळी 'ही' कामं केल्यास होईल अपार धनलाभ; आर्थिक संकट होईल दूर