Nadi Dosh Astrology: आपण अनेकदा पाहतो, हिंदू धर्मात लग्नापूर्वी वधू-वराची कुंडली गुणमिलन करणे महत्त्वाचे मानले जाते. जेणेकरून त्यांचं वैवाहिक जीवन भविष्यात उत्तम असते असे मानले जाते. विवाह जुळवताना ज्योतिषतज्ज्ञ वधू-वराच्या कुंडलीतील नाडी दोष, भकूट दोष, गण, मैत्री स्वभाव इत्यादी पाहून वधू-वरांच्या कुंडली जुळवतात. ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्याच्या कुंडलीत भकूट दोष असेल तर त्यांना लग्नानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत नाडी दोष असल्यास विवाह करत नाही. अशा लोकांना लग्नानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि घटस्फोटही होऊ शकतो. जाणून घेऊया नाडी दोष काय आहे? त्याचे उपाय काय?
नाडी दोष म्हणजे काय?
एका वृत्तसंस्थेने घेकलेल्या मुलाखतीनुसार ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा म्हणतात, ज्योतिषशास्त्रानुसार वधू आणि वर दोघांची नाडी एकच असेल तर हा दोष निर्माण होतो. नाडी दोषाचे तीन प्रकार आहेत, पहिला आदि नाडी, दुसरा मध्य नाडी आणि तिसरा अंत्य नाडी.
नाडी दोषाचे परिणाम
- ज्योतिषशास्त्रानुसार, जर वधू आणि वर दोघांची नाडी एकच असेल तर त्याचे समाधान खूप महत्वाचे आहे.
- नाडी दोषाच्या उपचाराशिवाय विवाह केल्यास, वधूला गर्भधारणेत समस्यांना सामोरे जावे लागते.
- याशिवाय मूलही असामान्य जन्माला येऊ शकते.
- ज्या लोकांना नाडी दोष असतो त्यांना अनेक प्रकारच्या अचानक समस्यांना सामोरे जावे लागते.
- वैवाहिक जीवन खूप वाईट जाते.
- नाडी दोषामुळे वधू-वरांना घटस्फोटालाही सामोरे जावे लागू शकते.
- प्रचलित मान्यतेनुसार, नाडी दोषामुळे वधू-वरांपैकी एकाचा किंवा दोघांचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
नाडी दोषावर उपाय
ज्योतिषशास्त्रानुसार नाडी दोष दूर करण्यासाठी पती-पत्नी दोघांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करणे आवश्यक आहे.
मंत्रोच्चार करण्यासोबतच नाडी दोष दूर करण्याचे कामही तज्ज्ञ व्यक्तीकडून करावे.
नाडी दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सोन्याचे धान्य, अन्न, गाय आणि वस्त्र दान करणे उत्तम मानले जाते.
नाडी दोष दूर करण्यासाठी व्यक्तीच्या वजनाएवढे अन्न दान करणे देखील फायदेशीर मानले जाते.
हेही वाचा>>>
Garud Puran: 'महिलांवर वाईट नजर टाकाल तर याद राखा...तुमचाही हिशोब होतोय!' महिलांवरील विविध अत्याचारासाठी गरुडपुराणात 'या' भयानक शिक्षा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )