New Year 2023 : नवे वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दर वर्षीप्रमाणे यंदा देखील जुने कॅलेंडल बदलून नवे कॅलेंडर प्रत्येक घरात येत असते. परंतु, फक्त घरातील कॅलेंडर बदलू नका, तर त्यापेक्षा काही सवयी बदलून चांगल्या सवयी अंगीकारण्याची गरज आहे. नवीन वर्ष 2023 मध्ये तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी काही संकल्प केले पाहिजेत.


हे संकल्प तुम्हाला चांगले भविष्य आणि यशाकडे घेऊन जातील. पण जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही कोणता संकल्प करावा. त्यामुळे काळजी करू नका, नवीन वर्षात या 10 संकल्पांचा अवलंब करून तुम्ही जीवनातील कोणतेही ध्येय साध्य करू शकता. 


नवीन वर्ष 2023 मध्ये हे 10 संकल्प करा


नकारात्मकतेपासून दूर राहा : 


नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा, कारण जोपर्यंत तुम्ही सकारात्मक रहाल तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही कामात अपयश मिळणार नाही. त्यामुळे नवीन वर्षात नकारात्मकतेपासून दूर राहून सकारात्मक विचारधारा अंगीकारण्याचा संकल्प घ्या.


निरोगी राहा : 


तुमचा सर्वोत्तम साथीदार म्हणजे तुमचे आरोग्य. त्यामुळेच निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही निरोगी राहाल तरच तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी आव्हानांना तोंड देऊ शकाल. त्यामुळे नवीन वर्ष 2023 मध्ये स्वतःला निरोगी ठेवण्याचा संकल्प घ्या.


योगाचा संकल्प : 


शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहारासोबत योगासनेही खूप महत्त्वाची आहेत. त्यामुळे नवीन वर्ष 2023 मध्ये नियमितपणे योग करण्याचा संकल्प घ्या.


वाईट सवयींपासून अंतर ठेवा : 


नवीन वर्षात वाईट सवयी पूर्णपणे सोडून द्या. मात्र, वाईट सवयी कधीही लागू नयेत. परंतु, तुम्हाला कोणत्याही प्रकारची वाईट सवय किंवा वाईट गोष्टींचे व्यसन असेल तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला ती सोडण्याचा संकल्प करा.


तणावापासून दूर राहा : 


परिस्थिती कशीही असो तुम्ही नेहमी आनंदी राहावे. जर तुम्ही आनंदी असाल तर कदाचित तुम्हाला तणावासारख्या परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे या वेळी नवीन वर्षात निराशा आणि तणावापासून स्वतःला दूर ठेवण्याची शपथ घ्या.


अपूर्ण कामे पूर्ण करा : 


नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमची रखडलेली अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा संकल्प करा. कोणतीही योजना अपूर्ण असल्यास ती पूर्ण करा.


कला-कौशल्य विकसित करा : 


प्रत्येक व्यक्तीकडे नक्कीच काहीतरी कला, कौशल्य किंवा ज्ञान असते. जर तुमच्यात काहीतरी करण्याचे कौशल्य असेल तर ते विकसित करा आणि 2023 मध्ये तुमच्या स्वप्नांना नवीन उड्डाण द्या.


नवीन काहीतरी शिका : 


नवीन वर्षात काहीतरी नवीन शिकण्याचा संकल्प करा. शिकण्यासाठी कधीही उशीर होत नाही. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शिकत राहिले पाहिजे. नवीन वर्षात, नवीन भाषा, नवीन काम, नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन काहीही शिकण्याचा संकल्प केला पाहिजे.


आदर-सन्मान करा : 


लहान असो वा मोठ्या सर्व लोकांचा आदर करायला शिका. यातून संस्कृतीचे दर्शन घडते. इतरांना आदर दिल्याने माणसाचे गुण वाढतात. म्हणूनच सर्व लोकांचा आदर करायला शिका.


स्वतःवर टीका करणे थांबवा :


आपल्या चुका मान्य करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु प्रत्येक चुकीसाठी स्वतःवर टीका करणे नेहमीच योग्य नसते. त्यामुळे नवीन वर्ष 2023 मध्ये स्वतःवर टीका न करण्याचा संकल्प घ्या. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


महत्वाच्या बातम्या


Baba Vanga : बाबा वेंगाची 2023 साठी भविष्यवाणी, वाचून अनेकांची झोप उडेल