Money Astrology : पैशाचा योग्य वापर केल्याने जीवन सार्थकी लागतं आणि जीवनात आनंद पसरतो. परंतु हेच, पैशांचा गैरवापर केल्यास विनाशाचा काळ सुरू होतो. ज्योतिषशास्त्रात संपत्तीचा संबंध ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावाशी जोडला जातो.


ज्योतिष शास्त्रानुसार, पैशाचा दुरुपयोग करणारे लोक ग्रहांच्या नकारात्मक प्रभावाचे शिकार होतात, त्यांच्यामागे नेहमी दारिद्र्य लागत. पैशाचा गैरवापर कशा प्रकारे माणसाला बरबादीकडे घेऊन जातो? कोणत्या सवयी माणसाला उद्धवस्त करतात? जाणून घेऊया.


अनावश्यक खर्च 


इतरांना दाखवण्यासाठी महागड्या वस्तू खरेदी करणं, आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करणं या अशा गोष्टी म्हणजे थेट पैशाचा गैरवापर आहे. जेव्हा आपण आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो तेव्हा कर्जाचा बोजा हळूहळू वाढत जातो. माणसाची ही सवय त्याला हळूहळू विनाशाकडे घेऊन जाते.


कमाईचा गैरवापर


काही लोक त्यांचे कमावलेले पैसे ड्रग्ज, जुगार किंवा काही बेकायदेशीर कामांवर खर्च करतात. या सवयी माणसाची आर्थिक स्थिती बिघडवतात. योग्य माहितीशिवाय केलेली गुंतवणूक माणसाला गरिबीच्या खाईत लोटते. पैशाच्या लोभापाई सट्टा खेळणारे देखील दारिद्र्यात ढकलले जातात.


इतरांवर अवलंबून राहणारे


नेहमी इतरांकडून पैशाची अपेक्षा करणं आणि तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून राहणं, या गोष्टी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनवतात. काम न करणं, पैसा वाया घालवणं आणि पैशाची बचत न करणं या सवयी संपत्ती नष्ट करतात.


नकारात्मक विचार


लोक नेहमी नकारात्मक विचार करून आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास न ठेवल्याने अनेक संधी गमावतात. त्यामुळे पैसे मिळण्यास अडथळा निर्माण होतो. इतरांची संपत्ती पाहणे, लोभ आणि मत्सर करणे आणि चुकीचे निर्णय घेणे, यामुळे माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं.


पैशाचे महत्त्व न कळणे


ज्यांना पैशाचं महत्त्व कळत नाही, अशा लोकांवर लक्ष्मी नेहमीच रागवते. अशा लोकांना कंगाल व्हायला वेळ लागत नाही. पैशाचा गैरवापर करणं, पैशाचा अपमान करणं आणि ते वाया घालवणं, यामुळे आर्थिक संकट निर्माण होतं. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Vastu Tips : तुळशीच्या बाजूला लावा फक्त 'ही' छोटी रोपं; काही दिवसांत दिसेल जादू, धनात होईल डबल वाढ


Rahu 2024 : राहू 'या' राशींवर पडणार भारी; येता काळ संघर्षाचा, वर्षभर अडचणी संपता संपणार नाही