Happy Married Life : सोमवारी भगवान शंकराची (Bhagwan Shankar) पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. सोमवारी अनेक जण उपवास ठेवतात आणि मनापासून भगवान शंकराची पूजा करतात. असे म्हणतात की, भोलेनाथ अतिशय भोळे असून ते भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. सोमवारी भगवान शंकराची पूजा आणि त्यांच्याशी संबंधित काही विशेष उपाय अतिशय प्रभावी मानले जातात. असे मानले जाते की, हे उपाय केल्याने वैवाहिक जीवनात सुख-शांती येते आणि भक्तांवर शिवाची कृपा होते. त्यामुळे भक्तगण मंडळी भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. पण सोमवीर पूजा केल्याने भगवान शंकर शुभ फळ देतात अशी श्रद्धा आहे. या सोमवारी करावयाच्या उपायांबद्दल जाणून घेऊया.


सोमवारी 'हे' उपाय करा
1) सोमवारी मनापासून भगवान शिवाची आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी सकाळी उठून स्नान करून शंकराची पूजा करावी.


2) सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी शिवलिंगावर चंदन, अक्षत, बेलाची पाने, धतुरा, दूध आणि गंगाजल अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात, असे मानले जाते.


3) सोमवारी भगवान शंकराला तूप, साखर, गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते.  भोलेनाथाची उदबत्ती व दीप लावून आरती करावी व प्रसाद वाटप करावा. असे केल्याने शिवाच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात आणि वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदते.


4) सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप केल्याने भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होते. या दिवशी कच्च्या गाईचे दूध शिवलिंगावर अर्पण करणे देखील एक प्रभावी उपाय मानले जाते.
सोमवारी आंघोळ केल्यावर पांढरे वस्त्र परिधान करावे. या दिवशी पांढर्‍या रंगाचे खाद्यपदार्थ गरजूंना दान करावेत. यामुळे कुंडलीतील चंद्र ग्रहाची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख-शांती नांदते.   


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


महत्वाच्या बातम्या


Numerology : 'या' तारखेला जन्मलेले लोक धनसंपत्तीच्या बाबतील असतात खूप भाग्यवान, सदैव असतो कुबेराचा आशीर्वाद


Vastu Tips : वास्तुशी संबंधित या 5 उपायांनी घरात येते समृद्धी, आर्थिक समस्या दूर होतात!