Mangal Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा मंगळ राशी परिवर्तन (Mars Transit 2024) करतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर पडतो. यातच आता मंगळ ग्रहाने नुकताच वृषभ राशीत प्रवेश केला आहे. तब्बल 18 महिन्यांनंतर मंगळाचं वृषभ राशीत मार्गक्रमण झालं आहे. यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तसेच या लोकांच्या संपत्तीतही वाढ होऊ शकते.


ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रह हा साहस, धैर्य, शौर्य, भूमी आणि क्रोधाचा कारक मानला जातो. ज्यांच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो ते त्यांच्या क्षेत्रात चांगली प्रगती करतात. मंगळाच्या मार्गक्रमणामुळे कोणत्या राशींचं (Zodiac Signs) नशीब उजळणार? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचं हे संक्रमण शुभ ठरू शकतं, कारण मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. तसेच मंगळ ग्रह तुमच्या कुंडलीच्या धन घरातून फिरणार आहे, त्यामुळे या काळात तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी हा सुवर्ण काळ असेल आणि तुम्हाला पैसे कमावण्याच्या भरपूर संधी मिळतील. यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. या काळात तुम्हाला अफाट धन-संपत्ती मिळेल. तसेच व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. या काळात तुमची संवाद कौशल्यं सुधारतील.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीतील मंगळाचं भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. या काळात तुमच्या धाडसात आणि शौर्यामध्ये वाढ झालेली दिसेल. याशिवाय या काळात तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढेल आणि व्यवसायात विशेष फायदा होईल. यादरम्यान तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन ऑफर मिळू शकते. या काळात तुमचे नवीन लोकांशी संबंध निर्माण होतील, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तसेच, विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदाचं असेल. यावेळी अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. 


कर्क रास (Cancer)


मंगळाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हे संक्रमण तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या घरात होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकतं. तसेच, तुमच्यासाठी पैसे कमावण्याचे अनेक स्त्रोत निर्माण होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमचा बँक बॅलन्स वाढेल. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. तसेच, यावेळी तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला प्रॉपर्टीच्या व्यवहारातून फायदा होऊ शकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Numerology : बाप्पाचा आवडता अंक कोणता? या नंबरशी तुमचंही आहे का काही कनेक्शन?