Margashirsha Purnima 2025 : हिंदू पंचांगानुसार, मार्गशीर्ष पौर्णिमेला (Margashirsha Purnima) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, दरवर्षी मार्गशीर्ष मासातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला मार्गशीर्ष पौर्णिमेचं व्रत केलं जातं. यावेळी मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी ग्रहांचा एक दुर्मिळ योग घडत आहे, जो काही राशींचं भाग्य पालटू शकतो. या राशींवर 4 डिसेंबरपासून देवी लक्ष्मीची कृपा राहील आणि त्यांच्या हाती अमाप पैसा येईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मार्गशीर्ष पौर्णिमेपासून मेष राशीच्या लोकांचा चांगला काळ सुरु होणार आहेय. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल. ऑफिसमध्ये प्रमोशनसह अनेक शुभ योग जुळून येणार आहे. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळेल. या काळात देवी लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. तुमची कोणतीही केस कोर्टात प्रलंबित असल्यास त्याचा निर्णय तुमच्या बाजूने लागेल. या काळात कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
मार्गशीर्ष पौर्णिमा कर्क राशीसाठी फार लकी ठरणार आहे. या काळात तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा राहील. तसेच, तुम्ही मागाल ती इच्छा पूर्ण होईल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. पण हा प्रवास सुखकर राहील. परदेशातून नोकरी करणाऱ्या लोकांचा व्यवसाय विस्तारेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नवीन संधी मिळतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी मार्गशीर्ष पौर्णिमा विशेष लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. जर तुम्हाला नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ फार शुभ असणार आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. अनेक काळापासून रखडलेली तुमची कामे तुम्हाला या कालावधीत पूर्ण करता येतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :