March Kharmas 2026 : हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात 'खरमास' (ज्याला 'मलमास' असेही म्हणतात) हा काळ शुभ कार्यांसाठी वर्ज्य मानला जातो. लग्नकार्य थांबवण्यामागे धार्मिक आणि खगोलीय अशी दोन्ही कारणे आहेत. या ठिकाणी ज्योतिषाचार्य डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी खरमास म्हणजे काय? तसेच, या कालावधीत शुभकार्य का केलं जात नाही या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

खरमास म्हणजे काय?

जेव्हा सूर्य धनु राशीत किंवा मीन राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्या काळाला 'खरमास' म्हणतात. एका वर्षात दोनदा खरमास येतो:1. धनु खरमास: साधारण 15 डिसेंबर ते 14 जानेवारी (मकर संक्रांतीपर्यंत).2. मीन खरमास: साधारण 14 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत.विवाह का थांबवले जातात? (कारणे)

1. सूर्याचे बळ कमी होणे :

ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आणि ऊर्जेचा स्रोत आहे. जेव्हा सूर्य आपल्या गुरूच्या (धनु किंवा मीन) राशीत जातो, तेव्हा त्याचे तेज किंवा प्रभाव कमी होतो असे मानले जाते. लग्नासारख्या शुभ कार्यासाठी सूर्याचे शुभ फळ मिळणे आवश्यक असते, जे या काळात मिळत नाही.

Continues below advertisement

2. गुरु ग्रहाचा प्रभाव :

धनु आणि मीन या गुरूच्या राशी आहेत. सूर्य जेव्हा आपल्या गुरूच्या घरी जातो, तेव्हा तो तिथे 'अतिथी' बनतो. अशा वेळी गुरूचे आणि सूर्याचे लक्ष केवळ आध्यात्मिक कार्याकडे असते. संसार सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली भौतिक ऊर्जा या काळात कमी असते.

3. शुभ कार्यांसाठी अशुभ काळ :

असे मानले जाते की खरमासमध्ये केलेले कार्य फलदायी ठरत नाही. त्यामुळे केवळ विवाहच नाही, तर मुंज, गृहप्रवेश, नवीन वास्तू खरेदी किंवा मोठे व्यवहार देखील या काळात टाळले जातात.

खरमासमध्ये काय करावे?

जरी शुभ कार्ये वर्ज्य असली, तरी हा काळ भक्ती आणि उपासनेसाठी अत्यंत उत्तम मानला जातो.कालसर्प ची पूजा करणे. पूजा हवन करणे. ग्रहांचे उपाय शनीची शांती पितृ दोष आणि श्राप योगाची शांती 

थोडक्यात सांगायचे तर: खरमास हा संसारातील आनंदाचा काळ नसून स्वतःला आध्यात्मिकरित्या शुद्ध करण्याचा काळ आहे. 

डॉ. भूषण ज्योतिर्विद

हे ही वाचा :                                        

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी मार्चचा तिसरा आठवडा ठरणार गेमचेंजर! कोणत्या राशींकडे पैसा येणार? साप्ताहिक राशीभविष्य