Puneri Marathi Joke : चिंता ही अशी बाब आहे, जी जिवंतपणीच मानवाला जाळत राहते, त्यामुळे चिंता करत बसण्यापेक्षा आपलं आणि दुसऱ्यांचं जीवन विनोदांच्या माधमातून आनंदमयी आणि हास्यमयी बनवलं पाहिजे. त्यासाठीच आज काही भन्नाट पुणेरी जोक्स वाचूया.


यजमान : आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो
पुणेकर : वा , तरीच छान थंड होता. . .
किमान शब्दात कमाल अपमान
😂😂😂


🌸स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?
तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !
😂😂😂


🌸स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)
पेशंट:- डॉक्टर,प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून):- आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर?
😂😂🤣


स्थळ : पुणे
एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला....!!
मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत...?
मुलाचे पुणेरी उत्तर: अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.
पुणेरी एकदम तिखट....
😂😂🤣


🌸**पुणेरी स्पेशल
बायको: अहो काल डॉक्टर मला सांगत होते की, माझा 'बीपी' वाढलाय! पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना?
नवराः अगं 'बीपी' म्हणजे 'बावळट पणा'
😂😂🤣


🌸** भन्नाट पुणेरी
बाळूः काकू, चिंटू आहे का घरी?
जोशी काकूः आहे ना, गरमा-गरम पोहे खातोय. तुलापण भूक लागली असेल ना?
बाळूः हो
जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये...
😂😂🤣


नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो..
नवरा: प्यायला पाणी आण ग?
बायको: तहान लागली आहे का ?
नवरा (संतापून): नाही माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायचं आहे.
😂😂🤣


🌸पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन:
"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का.?"
😂😂😂


मित्र :- एवढ्या उशीर पर्यंत ऑनलाईन काय करतोय….?
मी :- वाट बघतोय….?
मित्र :- कश्याची….?
मी :- बॅटरी लो होण्याची...
😨😨😨🤪🤪😂😂😝🤣🤣🤣


आत्ताच्या मुली क्रिम लावून गोऱ्या होतात.. आणि, लग्नानंतर पोरग काळ झालं की लगेच म्हणतात बापावरच गेलंय…
😂😂🤣


हेही वाचा:


Marathi Jokes : अहो थोडं हसा की... एका माणसाने पिंटूला विचारलं; तुझ्या पप्पांचं नाव काय? पिंटू म्हणतो...