Mangala Gauri 2024 Wishes In marathi : श्रावण महिना हा अनेक व्रत-वैकल्यांनी भरलेला असतो. यात मंगळागौर (Mangala Gauri 2024) व्रत हे श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी केलं जातं. हे व्रत विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात, तर अविवाहित महिला चांगला नवरा मिळावा म्हणून करतात. या दिवशी अन्नपूर्णा देवीची आणि शंकराच्या पिंडीची पूजा केली जाते आणि रात्री महिला विविध खेळ खेळून हा सण उत्साहात साजरा करतात. या दिवशी तुमच्या प्रियजनांना मंगळागौरीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे खास संदेश (Shravan Somvar Wishes in Marathi) पाठवू शकता किंवा स्टेटसला किंवा फोटोंना कॅप्शनही (Mangalagaur Captions) देऊ शकता.


मंगळागौरी शुभेच्छा संदेश (Mangalagaur 2024 Wishes In Marathi)


सोनपावलांनी गौरी आली घरी
मनोभावे करूयात तिचे पूजन
मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा!


श्रावण मासी साधला ऊन पावसाचा सुंदर मेळ
चला मिळून खेळूया मंगळागौरीचे खेळ
मंगळागौर व्रताच्या सर्वांना शुभेच्छा!


सणासुदीची घेऊन उधळण
आला हा हसरा श्रावण
सौभाग्यवती पुजती मंगळागौर
खेळ खेळुनी पारंपरिक थोर
मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा!


मंगल आरती सोळा वातींची
पुजा करु शिवा सह गौरीची
जय जय मंगळागौरी..
मंगळागौरी व्रताच्या शुभेच्छा!


श्रावणामुळे पसरली हिरवळ
सुंदर दिसे निसर्गाची किमया
मंगळागौर खेळायची ना
मग चला जमुयात सर्व सख्या
मंगळागौरी व्रताच्या सर्वांना शुभेच्छा!


मंगळागौर पुजनानिमित्त
तुम्हाला आणि तुमच्या
परिवाराला मंगळागौर
व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!


मंगळागौरी माते नमन करते तुला
अखंड सौभाग्य लाभू दे मला


पावसाच्या रिमझिम सरींनी
चहूकडे दरवळला मातीचा सुवास
एकमेकींना शुभेच्छा देऊन
साजरी करूयात मंगळागौर खास
मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा!


श्रावणाच्या आगमनाने
बहरली कांती..
मंगळागौर पुजनाने मिळो
सर्वांना सुखशांती..
मंगळागौरी व्रताच्या सर्वांना शुभेच्छा!


ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा!


फुगडी खेळा वा झोका कुणी
तर कुणी खेळा मंगळागौर
आला श्रावणमास त्याचा
आनंद घेऊया चौफेर
मंगळागौर व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!


श्रावण आला, घेऊन सोबत मंगळागौरी
हिंदोळ्या भोवती जमलेल्या पोरी
रुसून बसलेली यादव राणी
सखी संघात गाते मधूर श्रावणगाणी
मंगळागौर पूजनाच्या सर्व सख्यांना खूप खूप शुभेच्छा!


हेही वाचा:


Mangala Gauri 2024 : आज श्रावणातील पहिली मंगळागौर; कशी करावी स्थापना? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व