Astrology: ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांना ग्रह जबाबदार मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्र बदलल्याने चढ-उताराची परिस्थिती निर्माण होते. एवढच नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आपल्या नात्यावर देखील परिणम करतात. ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. शनिदेवाला (Shani) कर्मानुसार फळ देणारी न्याय देवता म्हणतात. तर मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हणतात. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे फळ देतात. तब्बल 30 वर्षानंतर मंगळ आणि शनी या ग्रहांचा संयोग कुंभ राशीत होणार आहे. दोन्ही ग्रह एकत्र आल्याने विनाशकारी योग तयार होत आहेत. मंगळ आणि शनीचा संयोग शुभ मानला जात नाही. असे असली तरी काही राशीच्या लोकांना त्याचा फायदा होईल. तर काही राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. मंगळ 15 मार्च रोजी कुंभ राशीत प्रवेश करेल, शनी आधीच येथे उपस्थित आहे. हा संयोग एप्रिल अखेरपर्यंत लागू राहील.
या राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे
मंगळ आणि शनीच्या युतीमुळे तूळ, मकर, कन्या, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. या काळात लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विचारपूर्वक कर्ज द्या. रागावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनात विलंब होऊ शकतो. जोडीदाराशी वाद टाळा.
या राशींना लाभ होईल
वृषभ (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनि आणि मंगळाचा संयोग खूप फायदेशीर ठरेल. करिअर आणि बिझनेसशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. प्रगतीची शक्यता आहे. पदोन्नती मिळू शकते, उत्पन्न वाढेल.
मिथुन (Gemini)
ग्रहांची ही भेट मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील शुभ राहील. एप्रिल अखेरपर्यंत लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. व्यवसायात लाभ होईल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. यश आणि प्रवासाची शक्यता आहे.
कुंभ (Aquarius)
कुंभ राशीचे लोक भाग्याच्या बाजूने असतील. आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. लग्नाची शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :