Mangal kendra Trikon Rajyog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाला (Mars) ग्रहांचा सेनापती म्हणतात. हा ग्रह साहस, पराक्रम, ऊर्जा, भूमि, रक्त आणि युद्धाचा कारक ग्रह मानला जातो. मंगळ ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा एका राशीत जवळपास 45 दिवसापर्यंत असतात. तसेच, मंगळ ग्रहाला सर्व 12 राशींमध्ये (Zodiac Signs) संक्रमण आणि परिवर्तन करण्यासाठी जवळपास 17-18 महिन्यांचा कालावधी लागतो. 

Continues below advertisement

जेव्हा मंगळ ग्रह आपली स्थिती बदलतात याचा प्रभाव सर्व राशींवर कोणत्या ना कोणत्या स्वरुपात अवश्य पडतो. नुकतंच मंगळ ग्रहाने आपल्या घरात म्हणजेच वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. यामुळे रुचक राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण केला आहे. हा संयोग अनेक राशींच्या जीवनात सौभाग्य आणि समृद्धी घेऊन येणारा आहे. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचं संक्रमण अचानक धनलाभ घेऊन येणार आहे. या काळात मंगळ ग्रह अष्टम चरणात स्थित आहे. तसेच, या काळात तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येतील. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. या काळात तुम्हाला मानसिक तणावातून तुमची सुटका होईल. भगवान हनुमानाची पूजा केल्याने तुम्हाला चांगलं फळ मिळेल. 

Continues below advertisement

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचं संक्रमण शुभकारक ठरणार आहे. दहाव्या स्थानाचे स्वामी मंगळ या राशीच्या पाचव्या स्थानी स्थित आहे. यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून शुभवार्ता मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, सरकारी योजनांचा तुम्हाला लाभ घेता येईल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचं संक्रमण फार शुभकारक ठरणार आहे. मंगळ ग्रह नवव्या चरणाचा स्वामी असून चौथ्या चरणात स्थित आहे. यामुळे केंद्र-त्रिकोण राजयोग निर्माण होणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगलं यश मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर प्रसन्न होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Chalis Yog 2025 : नोव्हेंबर महिन्यात बुध-शुक्र ग्रहाचा शक्तिशाली 'चालीस योग'; आज रात्रीपासूनच 'या' 4 राशींचं भाग्य उजळणार, लवकरच लागणार लॉटरी