Mangal Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाला (Mangal Gochar)ऊर्जा आणि साहसचा कारक ग्रह मानतात. द्रिक पंचांगानुसार, 2 एप्रिल 2026 रोजी गुरुवारच्या दिवशी म्हणजेच उद्या दुपारी 3 वाजून 37 मिनिटांनी मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन रास ही जल तत्व राशी आहे. तर, मंगळ ग्रहाला अग्नीचा तत्व मानतात. त्यामुळेच, या दोघांचा संगम काहीसा असामान्य मानतात. विशेष म्हणजे, मीन राशीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शनिसह मंगल ग्रहाची युती होणार आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार, हा फार आव्हानात्मक काळ आहे. 

Continues below advertisement

मंगळ ग्रह मीन राशीत 2 एप्रिल ते 11 मे 2026 पर्यंत उपस्थित आहेत. पण, या कालावधीत 14 एप्रिलपर्यंतचा काळ हा सर्वात संवेदनशील काळ मानला जातो. कारण तोपर्यंत सूर्यसुद्धा याच राशीत असणार आहे. मीन राशीत 3 ग्रहांच्या युतीमुळे कोणत्या राशींच्या अडचणीत वाढ होऊ शकते हे जाणून घेऊयात. 

मेष रास - या दरम्यान मेष राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा रागाच्या भरात तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकता. 

Continues below advertisement

वृषभ रास - वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे पैशांचा खर्च जपून करा. 

कन्या रास - कन्या राशीच्या लोकांनी आपल्या वागण्यावर लक्ष केंद्रित करावं. छोट्या छोट्या गोष्टींमुळे वाद होऊ शकतात. तर, मीन राशीच्या लोकांनी या काळात सतर्क राहणं गरजेचं आहे. 

मंगळ ग्रहाच्या संक्रमणाचा देशभरात होणारा प्रभाव 

ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाच्या संक्रमणाचा देशभरात प्रभाव पाहायला मिळणार आहे. या काळात राजतीनी, समाज आणि प्राकृतिक घटनांमध्ये घडामोडी घडताना दिसतील. त्यामुळे या कालावधीत घाबरुन न जाता सतर्क राहण्याची गरज आहे. 

'हा' विशेष उपाय करा 

जर तुम्हाला हा काळ अधिक चांगला बनवायचा असेल तर या दिवशी तुम्ही काही खास उपायसुद्धा अंगिकारु शकता. विशेष म्हणजे, गरजूंची मदत करा, तुमच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांबरोबर चांगले व्यवहार ठेवा. भगवान हनुमानाची पूजा करा. तसेच, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अदर करा.

हे ही वाचा :                                               

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Trigrahi Yog 2026 : सूर्य, शनि आणि मंगळ ग्रहामुळे जुळून येणार 'त्रिग्रही राजयोग'; हनुमान जयंतीपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार, पदरात फक्त पुण्य