Mangal Gochar 2025 : ग्रहांचा सेनापती मंगळ दर 45 दिवसांनी आपली रास बदलतो. कधीकधी तो त्याच्या सर्वोच्च राशीतून त्याच्या निम्नतम राशीकडे जातो. 21 जानेवारीला मंगळ ग्रहाने आपली निम्न कर्क राशी सोडून मिथुन राशीत प्रवेश केला आहे. मंगळ निच्च राशीत असल्यामुळे अनेक राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पण मंगळ मिथुन राशीत प्रवेश करताच या राशीच्या लोकांचं नशीब अचानक चमकू शकतं. मंगळाच्या चालीतील बदलामुळे नीचभंग राजयोग तयार होत आहे, जो 3 राशींसाठी भाग्याचा ठरेल, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


मंगळाच्या राशी बदलाचा वृषभ राशीच्या लोकांना प्रचंड फायदा होऊ शकतो. मंगळ तुमच्या धनाच्या घरावर विराजमान आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना अपार संपत्ती मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. यासह तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. तुम्ही तुमच्या बिझनेस पार्टनरसोबत करत असलेल्या बिझनेसमध्ये तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. आर्थिक स्थितीही चांगली राहील. आत्मविश्वास झपाट्याने वाढेल.


सिंह रास (Leo)


मिथुन राशीतील मंगळाचं संक्रमण या राशीच्या लोकांसाठी खूप खास असू शकतं. या राशीच्या लोकांना त्यांच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकतं. यासोबतच वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता जास्त आहे. चैनीच्या वस्तूंमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे. नशीब पूर्ण साथ देईल. यासोबत शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे तुम्हाला मिळू शकतात. जीवनात आनंदाची खेळी होऊ शकते. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. जोडीदारासोबत आनंदात राहाल.


तूळ रास (Libra)


मंगळाच्या राशी बदलामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकतं. प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. कुटुंब आणि मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. कामाच्या संदर्भात तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो. यातून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवू शकता. जीवनात सकारात्मकता वाढेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Mauni Amavasya 2025 : तब्बल 50 वर्षांनंतर मौनी अमावस्येला बनतोय दुर्मिळ त्रिवेणी योग; 3 राशींचं नशीब चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार