Mangal Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह (Mars) एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात. याचा प्रभाव सर्व 12 राशींच्या जीवनावर होतो. मंगळ ग्रह हा भूमि पुत्राबरोबरच, युद्ध, शक्ती, ऊर्जा, साहस आणि परक्रमाचा कारक मानला जातो. सध्या मंगळ ग्रह मिथुन राशीत विराजमान आहे.


मात्र, होळीनंतर म्हणजेच 3 एप्रिल 2025 रोजी 1 वाजून 56 मिनिटांनी मंगळ ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या पहिल्या आणि आठव्या चरणाचे स्वामी असून चौथ्या चरणात प्रवेश करणार आहेत.या राशींच्या जीवनात अनेक घडामोडी घडतील. तसेच, आयुष्यात अनेक सुख-सुविधांमध्ये बदल पाहायला मिळतील. कुटुंबात सुख-शांती नांदणार नाही. या काळात तुम्हाला करिअरमध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. सहकाऱ्यांचा देखील तुम्हाला पाठिंबा मिळणार नाही. तसेच, तुमच्या व्यवसायावर देखील याचा परिणाम पाहायला मिळेल. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ फार कठीण असणार आहे. तुम्हाला आर्थिक चणचण भासू शकते. त्यामुळे या काळात पैशांच्या बाबतीत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तसेच, विनाकारण पैसे खर्च करु नका. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत देखील सतर्क राहण्याची गरज आहे. वातावरणातील बदलांमुळे तुमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार घडू शकतात. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या बाबतीत सतर्क राहा. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी देखील मंगळ ग्रहाच्या संक्रमणाचा काळ कठीण असणार आहे. या काळात तुम्हाला कामाच्या बाबतीत खूप चिंता जाणवू शकते. तुमच्या वागणुकीचा परिणाम तुमच्या कामावर देखील होऊ शकतो. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या जुन्या चुकीतून खूप काही शिकण्याची गरज आहे. या काळात तुमच्या पार्टनरबरोबर दुरावा निर्माण होऊ शकतो. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                                      


Shani Gochar 2025 : होळीनंतर शनीचं राशी परिवर्तन, 'या' राशींवर असणार साडेसातीचा प्रभाव; 24 तास राहणार करडी नजर