Mangal Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 7 जून रोजी मंगळ ग्रह (Mars) संक्रमण करुन सिंह राशीत प्रवेश करणार आहे. अग्नीचा कारक मंगळ ग्रह सूर्याच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत येणं चांगलं ठरणार नाही. या राशीवर (Zodiac Signs) मंगळ केतू ग्रहाची भयानक युती होणार आहे.
सिंह राशीत केतू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे सिंह राशीतच मंगळ ग्रहाचं संक्रमण होऊन मंगळ आणि केतू ग्रहाची अशुभ युती होणार आहे. सूर्याच्या राशीत मंगळ आणि केतू ग्रहाची युती झाल्यामुळे कुजकेतू योग जुळून येणार आहे. या अशुभ ग्रहाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आहे. तसेच, कोणत्या राशींवर संकट येणार आहे ते जाणून घेऊयात.
मंगळ ग्रह 28 जुलैपर्यंत सिंह राशीत असणार आहे. त्यामुळे 51 दिवसांपर्यंत मेषसह 5 राशींच्या लोकांसाठी हा काळ फार कष्टायचा ठरेल. त्यामुळे या काळात फार सावधान राहण्याची गरज आहे.
मेष रास (Aries Horoscope)
मंगळ ग्रहाचं संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी फार संकटांचं ठरणार आहे. या काळात तुम्हाला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये देखील अडथळे येऊ शकतात. तुमचे विरोधक तुमच्या समस्या अधिक वाढवतील. तसेच, तुमचं मन देखील अशांत असेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
मंगळ ग्रहाच्या संक्रमणाने वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील तुम्हाला तणावाचा सामना करावा लागेल. तुमच्या संपत्तीच्या बाबतीत घरात सतत वाद निर्माण होतील.
सिंह रास (Leo Horoscope)
मंगळ ग्रहाचं संक्रमण सिंह राशीतच होणार आहे. याच ठिकाणी केतूबरोबर युती होणार आहे. त्यामुळे या राशीसाठी हा काळ फार कष्टायचा ठरु शकतो. या दरम्यान तुमच्या स्वभावात आक्रमकता दिसून येईल. तसेच, गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचं संक्रमण फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. करिअरमध्ये अनेक अडथळे येतील. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. नाती दुरावू शकतात.
मीन रास (Pisces Horoscope)
मंगळ ग्रह संक्रमणाच्या काळात मीन राशीच्या स्वभावात बदल जाणवेल. या काळात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, खर्चावर देखील नियंत्रण ठेवावं. अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :