Mangal Gochar 2025 : वैदिक शास्त्रात मंगळ ग्रहाचं स्थान फार विशेष आहे. ग्रहांचा सेनापती असणारा मंगळ ग्रह (Mangal Gochar) साहस, आत्मविश्वास, शौर्य, पराक्रम आणि राग, संपत्तीचा कारक मानला जातो. त्यामुळे मंगळ ग्रहाच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिसून येतो.
मंगळ ग्रह एका राशीत जवळपास 45 दिवस स्थित असतात. डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच मंगळ ग्रहाचा धनु राशीत प्रवेश होणार आहे. मंगळ ग्रहाचं गुरुच्या राशीत प्रवेश केल्याने काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, या काळात तुमच्या जीवनात अनेक नवीन गोष्टी घडताना दिसतील. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रह 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजून 27 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मंगळ ग्रह हा मिथुन राशीच्या कुंडलीतील सहाव्या आणि अकराव्या चरणाचा स्वामी असून तो सातव्या चरणात संक्रमण करणार आहे. या कालावधीत तुम्हाला अनेक क्षेत्रात चांगलं यश मिळेल. सकारात्मक परिणाम मिळतील. तसेच, कुटुंबात शुभवार्ता ऐकायला मिळेल. या कालावधीत तुम्हाला एखादी शुभवार्ता देखील मिळू शकते. तसेच, तुमच्यातील नेतृत्वक्षमता दिसून येईल. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. शेअर मार्केटमधूनही तुम्हाला लाभ मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचं धनुच्या राशीत होणारं संक्रमण फार लाभदायी ठरेल. या कालावधीत तुमच्या जीवनात आनंद टिकून राहील. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. नवीन जबाबदाऱ्या देखील तुमच्यावर येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल. सकारात्मक ऊर्जा तुमच्यात निर्माण झालेली दिसेल. तसेच, या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग देखील तुमच्यासाठी खुले होतील.
तूळ रास (Libra Horoscope)
या राशीच्या दुसऱ्या आणि सातव्या चरणाचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे तो आता तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. या काळात समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. प्रगतीचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. परदेशात जाण्याची संधीदेखील तुम्हाला मिळू शकते. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त चांगली असेल. नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. मित्र परिवाराच्या मदतीने तुमची अनेक स्वप्न तुम्हाला साकार करता येतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :