Mangal Budh Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ (Mars) ग्रहाला ऊर्जा, साहस, पराक्रम, भूमी आणि विवाहाचा कारक ग्रह मानतात. मंगळ ग्रह जुलै महिन्याच्या शेवटी संक्रमण करणार आहे. मंगळ ग्रहाचं हे संक्रमण दोन शत्रू ग्रहांची युती करणार आहे. यामुळे 5 राशींवर अशुभ परिणाम होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, 28 जुलै 2025 रोजी मंगळ ग्रह संध्याकाळी 7 वाजून 58 मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मंगळ आणि बुध ग्रहाची युती होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आणि बुध एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. यामुळे काही राशींच्या आरोग्य आणि आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मंगळ ग्रहाचं संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या फार नुकसानकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. तसेच, पैशांचा विनाकारण तुम्ही वापर करा. घरात वादविवाद होऊ शकतात.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी युतीचा काळ हा फार आव्हानात्मक ठरणार आहे. कारण या काळात तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. तुम्ही सतत मानसिक तणावात राहाल. कोणत्याच कामात तुमचं मन रमणार नाही आणि तुमची चिडचिड होईल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीसाठी मंगळ आणि बुध ग्रहाची युती करिअरसाठी फार आव्हानात्मक ठरु सकते. या काळात तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तसेच, ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहा. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला तितकंसं मिळणार नाही.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांनी या काळात सावध राहण्याचा प्रयत्न करावा. तसेच, कोणत्याही कारणासाठी लांबच्या प्रवासाला जाणं टाळावं. कामाच्या बाबतीत सतर्कता ठेवा. धैर्याने काम करा.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी हा काळ फार धोकादायक ठरु शकतो. या काळात तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे अनेक विषयांवरुन वादविवाद होऊ शकतात. तुम्हाा नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. समजूतदारीने व्यवहार करणं गरजेचं आहे.
हेही वाचा :