एक्स्प्लोर

Numerology : 16 तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये 'ही' 3 असतात खास वैशिष्ट्य; वाचा स्वभाव, करिअर आणि लव्ह लाईफ

Numerology 16 Born People Personality : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 16 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. हा अंक फार शुभ मानला जातो. 

Numerology 16 Born People Personality : ज्योतिष शास्त्रानुसार, फक्त एखाद्या व्यक्तीची कुंडलीच पाहून त्या व्यक्तीचं भविष्य आणि स्वभाव ओळखता येतं असं नाही. तर, अंकशास्त्रानुसारही (Ank Shastra) व्यक्तीच्या जन्मतारखेच्या माध्यमातून व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या आवडी निवडी ओळखता येतात. या ठिकाणी आपण आजच्या दिवशी म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या 16 तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो हे जाणून घेणार आहोत. 

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 16 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. हा अंक फार शुभ मानला जातो. 

कसा असतो स्वभाव?

या तारखेला जन्मलेल्या लोकांची पर्सनालिटी चुंबकासारखी असते. या लोकांचे डोळे मोठे असतात. तसेच, स्वभावाने हे लोक फार शांत असतात. या तारखेला जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे लोक कधीच प्रामाणिकपणाची साथ सोडत नाहीत. तसेच इतरांची मदत करण्यासाठी हे लोक कधीच मागे फिरत नाहीत. नेहमी मदतीचा हात पुढे करतात. लोकांची अडचण हे लोक फार सहजतेने ओळखतात. 

अनेकदा या लोकांना ओळखणं तसं कठीणच वाटतं. कारण या जन्मतारखेच्या लोकांचा स्वभाव फार रहस्यमयी असतो. हे आपल्या भावना पटकन बोलून दाखवत नाहीत. मात्र, असे असले तरी हे लोक फार मोकळ्या विचारांचे असतात. यांच्या आजूबाजूच्या किंवा यांच्या सानिध्यात असलेल्या प्रत्येक लोकांना यांच्याबरोबर राहून फार पॉझिटीव्ह वाटतं. या जन्मतारखेच्या लोकांना फार कमी राग येतो. मात्र, जेव्हा राग येतो त्यावर नियंत्रण ठेवणं फार कठीण जातं. 

करिअर 

या जन्मतारखेला जन्मलेले लोक फार क्रिएटिव्ह असतात. टीचिंग किंवा क्रिएटिव्ह कामाकडे यांचा ओढा जास्त असतो. तसेच, कोणतंही काम करताना हे लोक फार मन लावून करतात. यामुळेच ज्या कोणत्या कामाला हे हात लावतात ते यशस्वीरित्या पूर्ण होतं. या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे लोक कोणत्याही संकटांचा सामना करायला घाबरत नाहीत. तसेच, या जन्मतारखेचे लोक बिझनेसमध्ये फार रमतात आणि यशस्वीही होतात. 

लव्ह लाईफ 

प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या जन्मतारखेचे लोक प्रेमाच्या बाबतीत थोडे भावनिक असतात. आपल्या जोडीदारावर हे जीव ओवाळून टाकतात. नात्यात यांना कोणत्याच प्रकारचा दिखावा आवडत नाही. तसेच, हे लोक जोडीदाराची चांगली काळजी घेतात. या जन्मतारखेचे लोक आपल्या अस्तित्वाने आजूबाजूला सकारात्मक वातावरण निर्माण करतात. 

हेही वाचा :                                                              

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Astrology : आज बुधादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 'या' 5 राशींच्या करिअरला मिळणार नवी दिशा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीला एप्रिलच्या चौथ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, हातात खेळणार पैसाच पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीला एप्रिलच्या चौथ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, हातात खेळणार पैसाच पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
Akshay Tritiya 2026: आजची अक्षय्य तृतीया दुप्पट भाग्याची! सोने-चांदी खरेदीचा 'हा' शुभ मुहूर्त, फार कमी लोकांना माहित, देवी लक्ष्मीच्या कृपेने भरभराट..
आजची अक्षय्य तृतीया दुप्पट भाग्याची! सोने-चांदी खरेदीचा 'हा' शुभ मुहूर्त, फार कमी लोकांना माहित, देवी लक्ष्मीच्या कृपेने भरभराट..
Shubh Yog 19 April 2026 : आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मालव्य राजयोगासह शुभ योगांचा संयोग; कर्कसह 'या' 5 राशींना लागणार लॉटरी, हातात पैसा येणार
आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मालव्य राजयोगासह शुभ योगांचा संयोग; कर्कसह 'या' 5 राशींना लागणार लॉटरी, हातात पैसा येणार
Weekly Horoscope: एप्रिलच्या चौथ्या आठवड्यात 12 पैकी फक्त 6 राशींची भरभराट! देवी लक्ष्मी कोणाला पावणार? कोणाच्या पदरात टेन्शन? साप्ताहिक राशीभविष्य
एप्रिलच्या चौथ्या आठवड्यात 12 पैकी फक्त 6 राशींची भरभराट! देवी लक्ष्मी कोणाला पावणार? कोणाच्या पदरात टेन्शन? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
Bhandara Crime News: भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
Jaykumar Gore : राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणात पाणी काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणात पाणी काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
Rohit Pawar and PM Modi: पराभवाचंही भांडवल करुन राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतकं माहीर...; पंतप्रधान मोदींच्या भाषणावर रोहित पवारांची टीका
पराभवाचंही भांडवल करुन राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतकं माहीर...; पंतप्रधान मोदींच्या भाषणावर रोहित पवारांची टीका
West Bengal Election 2026: महिला आरक्षणावरुन रणकंदन, पण पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसने किती महिलांना उमेदवारी दिली?
महिला आरक्षणावरुन रणकंदन, पण पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसने किती महिलांना उमेदवारी दिली?
Akshay Tritiya 2026: आजची अक्षय्य तृतीया दुप्पट भाग्याची! सोने-चांदी खरेदीचा 'हा' शुभ मुहूर्त, फार कमी लोकांना माहित, देवी लक्ष्मीच्या कृपेने भरभराट..
आजची अक्षय्य तृतीया दुप्पट भाग्याची! सोने-चांदी खरेदीचा 'हा' शुभ मुहूर्त, फार कमी लोकांना माहित, देवी लक्ष्मीच्या कृपेने भरभराट..
Embed widget