Mangal Ast 2025: मंगळाचे नाव काढताच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण अनेकांचा असा समज आहे की, मंगळ हा कुंडलीत असल्यास विविध अडचणींचा सामना करावा लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार, तसं पाहायला गेलं तर ग्रहांचा सेनापती म्हणजे मंगळ हा ज्योतिषशास्त्रात धैर्य, बंधुता, शौर्य, रक्त, ऊर्जा, युद्ध आणि सैन्य इत्यादींचा दाता मानला जातो. ठराविक काळानंतर, मंगळ त्याचे राशिचक्र बदलतो, नक्षत्रांचे संक्रमण करतो, त्याच्या उदयाचा आणि अस्ताचा सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम होतो. जाणून घेऊया मंगळाच्या अस्ताचा कोणत्या राशींच्या जीवनावर अशुभ प्रभाव पडेल? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
मंगळाचा अस्त कधी होणार?
वैदिक दिनदर्शिकेनुसार, मंगळ 1 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:36 वाजता मावळेल आणि 182 दिवस या स्थितीत राहील. मात्र, मंगळ अस्त होण्यापूर्वी काही राशींना विविध आव्हानांना सामोरे जावे लागेल. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ 1 नोव्हेंबर रोजी अस्त करेल, ज्याचा अनेक राशींच्या जीवनावर अशुभ प्रभाव पडेल. नोव्हेंबरमध्ये मंगळ ग्रहण होण्यापूर्वी कोणत्या तीन राशींवर सर्वात जास्त ताण असेल ते जाणून घेऊया.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाची स्थिती फलदायी ठरणार नाही. येणारा काळ करिअरच्या दृष्टिकोनातून तरुणांच्या हिताचा नसेल. ज्यांना नुकतीच नोकरी मिळाली आहे त्यांनी कामाबाबत निष्काळजीपणा दाखवू नये. अन्यथा तुमचा बॉस तुम्हाला नोकरीतून काढून टाकू शकतो. व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. दाम्पत्यांमध्ये तणाव निर्माण होईल. घरातील सदस्यांशी भांडण होऊ शकते.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांच्या आरोग्यावर मंगळ ग्रहाचा अशुभ परिणाम होईल. गैरसमजामुळे बॉसशी वाद होऊ शकतो. नुकतेच लग्न झालेल्या लोकांचे नाते नोव्हेंबर महिन्यापूर्वी तुटू शकते. व्यावसायिकांचे नुकसान होणार असल्याने त्यांना पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागेल. नोव्हेंबर महिन्यापर्यंत बेरोजगार व्यक्ती चिंतेत राहतील. अति चिंतेमुळे आरोग्यही बिघडू शकते.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी मंगळाचा अस्त शुभ ठरणार नाही. कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्यासाठी अनुकूल नसेल. बॉस आणि सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. दाम्पत्यांमध्ये तणाव निर्माण होईल. कौटुंबिक खर्चाबाबत कुटुंबातील सदस्यांशी वाद होईल. व्यापारी आणि नोकरदार लोकांना आर्थिक नुकसान होईल. मीन राशीच्या लोकांसाठी मित्रांसोबत बाहेर जाण्याचे नियोजन यावेळी चांगले होणार नाही. प्रवासादरम्यान गंभीर दुखापत होऊ शकते.
हेही वाचा>>
April 2025 Astrology: एप्रिल 'या' 3 राशींसाठी टेन्शन फ्री! बुधाच्या संक्रमणानं धन-सुखाचा पाऊस पडेल! संपत्तीत वाढ, नोकरीत प्रमोशन
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )