Horoscope Today 5 March 2025 : आज 5 मार्च दिवस म्हणजेच बुधवारचा दिवस आहे. आजचा दिवस गणरायाला समर्पित आहे. तसेच, आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Today Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुमच्या आयुष्यात चांगले परिणाम दिसून येतील. तसेच, तुमचे जीवन आनंदी राहील. काही खास लोकांशी आज तुमच्या भेटीगाठी होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या बॉसकडून तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल. आज तुम्हाला जुन्या चुकांमधून काहीतरी बोध घ्यावा लागेल.
वृषभ रास (Taurus Today Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्टया सक्षमतेचा असणार आहे. मात्र, आजच्या दिवशी अनावश्यक पैसे खर्च करु नका. तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अन्यथा महिन्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तुमची प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करा.
मिथुन रास (Gemini Today Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. नवीन योजनांचा चांगला लाभ घेता येईल. तसेच, कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा व्यवहार चांगला असेल. तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील त्या तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रगतीचे अनेक मार्ग मिळतील. या संधीचा वेळीच लाभ घेणं गरजेचं आहे.
कर्क रास (Cancer Today Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तसेच, तुमच्यात निर्णय घेण्याची क्षमता दिसून येईल. तुमच्या मेहनतीला देखील चांगलं यश मिळणार आहे. त्यामुळे सतत नवीन प्रयोग करत राहा. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, सिझनल फळभाज्यांचा आहारात समावेश करा. यामुळे तुम्ही हेल्दी राहाल.
सिंह रास (Leo Today Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आजच्या दिवशी कोणावरही अंधपणाने विश्वास ठेवू नका. तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात येणाऱ्या समस्या हळुहळू दूर होतील. एखादं सरकारी काम रखडलं असेल तर ते वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कन्या रास (Virgo Today Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. आज कुटुंबातील सदस्यांबरोबर विनाकारण वाद घालू नका. तुमच्या बोलण्यामुळे इतरांची मनं दुखवू शकतात. तसेच, जर एखादं काम अनेक दिवसांपासून प्रयत्न करुनही होत नसेल तर हिंमत हारु नका. धीर धरा आणि स्वत:वर विश्वास ठेवून पुन्हा नवीन कामाला सुरुवात करा. तुम्हाला यश मिळेल.
तूळ रास (Libra Today Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज जोडीदाराबरोबर तुमचं नातं अधिक घट्ट असेल. तसेच, तुमच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतील. समाजात तुमच्या कामगिरीचं चांगलं कौतुक होईल. तुम्ही लवकरच बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. अनावश्यक गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानसिक शांततेचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या शारीरिक स्वास्थ्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स मिळत राहतील. आज तुमच्यावर बाप्पाची कृपा असणार आहे. त्यामुळे कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेण्याची गरज नाही.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज तुमच्या मनात सकारात्मक विचार येतील. तसेच, एखादं नवीन काम सुरु करण्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्ही नवीन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. किंवा एखाद्या योजनेत तुमचे पैसे गुंतवू शकता. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्ही निष्काळजीपणा करु नका. वेळेवर डाएट फॉलो करा.
मकर रास (Capricorn Today Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला पाहायला मिळेल. तसेच, जर तुम्ही कोणाकडून पैसे उधारी म्हणून घेतले असतील तर ते वेळीच परत करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, भविष्याच्या संदर्भात तुम्ही चांगली योजना आखाल. मात्र, त्यावर काम करणं गरजेचं आहे.
कुंभ रास (Aquarius Today Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळालेला दिसेल. तसेच, तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, जे लोक बॅंकिंग क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना चांगला लाभ मिळेल. तुमच्या घरी लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे.
मीन रास (Pisces Today Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा सावधानतेचा असणार आहे. आज कुठेही पैसे खर्च करताना नीट विचारपूर्वक पैसे खर्च करा. अन्यथा महिन्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक चणचण भासू शकते. आज विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळताना दिसणार आहे. तसेच, आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: