Continues below advertisement

Makar Sankranti 2026 : हिंदू पंचांगानुसार, 2026 वर्षाला सुरुवात झाली आहे. या वर्षातला पहिला आणि हिंदू धर्मात महत्त्वाचा असा मकर संक्रांतीचा सण लवकरच येणार आहे. येत्या 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत (Makar Sankranti) साजरी करण्यात येईल. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस ऊर्जा बदलाचा असल्यामुळे काही गोष्टी टाळल्यास सकारात्मक फळ मिळते, असं ज्योतिष शास्त्रात सांगितलंय. त्यानुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊयात. 

मकर संक्रांतीला 'या' गोष्टी टाळा : 

1. राग, भांडण आणि कटू शब्द

मकर संक्रांतीच्या दिवशी राग, वाद-विवाद, अपशब्द टाळावेत. तसेच, समाजात गोडवा पसरवण्याचा प्रयत्न करावा. 

Continues below advertisement

कारण : सूर्य देव शांती आणि संयमाचे प्रतीक मानले जातात. राग केल्यास सूर्यदोष वाढतो.

2. खोटं बोलणं आणि फसवणूक

असत्य, कपट, चुकीचे व्यवहार टाळावेत.

कारण: मकर संक्रांती सत्य आणि कर्मशुद्धीचा दिवस मानला जातो.

3. केस, नखं कापणे

या दिवशी केस कापणे किंवा नखं कापणे टाळावे.

कारण : ऊर्जा कमी होते आणि पुण्यकाळात अपव्यय होतो, अशी मान्यता आहे.

4. नकारात्मक विचार आणि शिवीगाळ

निराशा, ईर्ष्या, द्वेष मनात आणू नये.

कारण : सूर्य संक्रमणकाळात विचारांचा थेट परिणाम कर्मावर होतो.

5. मांसाहार आणि मद्यपान

शक्यतो मांस, दारू, तंबाखू टाळावे.

कारण : हा दिवस सात्त्विक मानला जातो, त्यामुळे तामसिक गोष्टी टाळाव्यात. 

6. गरिबांचा किंवा मोठ्यांचा अपमान

गरजू, वृद्ध, आई-वडील यांचा अपमान टाळावा.

कारण : सूर्य हा पितृकारक ग्रह आहे; अपमान केल्यास पितृदोष वाढतो.

7. दान न करणे

या दिवशी दान टाळू नये (विशेषतः तीळ, गूळ, वस्त्र).

कारण : दान न केल्यास पुण्यसंधी वाया जाते.

मकर संक्रांतीचे महत्त्व 

मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि उत्तरायण सुरु होते. हा सण नवीन पिकाच्या आगमनाचे प्रतीक आहे आणि भारताच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या नावांनी हा सण ओळखला जातो. मकर संक्रांत म्हणजे नवीन पिकाच्या आगमनाचा उत्सव. या दिवशी शेतकरी सूर्यदेवाचे आभार मानतात. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, सूर्य देव सर्व प्राणिमात्रांना जीवन देतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान आणि दान केल्याने पापांचा नाश होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरिबांना दान करणे पुण्य मानले जाते. या दिवशी तिळाचे लाडू किंवा तिळाचे इतर पदार्थ खाणे देखील शुभ मानले जाते.

हे ही वाचा :                  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Hans-Malavya Rajyog 2026 : नवीन वर्षात 'हंस-मालव्य राजयोग' करणार कमाल; तब्बल 50 वर्षांनंतर 'या' राशी होतील मालामाल, श्रीमंतीचे योग