Astrology 14 January 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच 14 जानेवारीपासून (Makar Sankranti 2025) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. वैदिक पंचांगानुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारीला पहाटे 5:32 वाजता मंगळ आणि गुरु ग्रह एकमेकांपासून 45 अंशांवर असतील, त्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होईल. ज्याचा शुभ परिणाम 3 राशींवर होईल. 14 जानेवारीपासून या राशींच्या सुख-संपत्तीत अपार वाढ होईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


कन्या रास (Virgo)


या राशीच्या लोकांसाठी गुरु आणि मंगळ यांच्यामध्ये तयार होणारा अर्धकेंद्र योग फलदायी ठरू शकतो. करिअर आणि कामाच्या दृष्टीने हा योग तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांना यश मिळेल. या काळात तुम्हाला चांगली डील मिळू शकते. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर हा काळ तुमच्यासाठी नवीन नोकरीची संधी घेऊन येईल. जे लोक आधीच कार्यरत आहेत त्यांना पदोन्नती मिळू शकते आणि पगारात वाढ होऊ शकते. याशिवाय वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. एकूणच हा काळ तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग देखील भाग्याचा सिद्ध होऊ शकतो. या योगाच्या प्रभावाने तुम्हाला नवीन वाहन किंवा घर मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तुमचे निर्णय ठामपणे घेऊ शकाल. तुमच्या जीवनात भौतिक सुखसोयी वाढतील. नोकरदारांना यश मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. तब्येत सुधारेल.


कुंभ रास (Aquarius)


या योगामुळे तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. लग्नासाठी इच्छुक असलेल्यांना चांगल्या ऑफर मिळू शकतात. वैवाहिक जीवनातही सुख-शांती राहील. या योगामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील. करिअर आणि व्यवसायातही प्रगती होण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. या काळात तुमचं आरोग्य चांंगलं राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Weekly Horoscope 13 To 19 January 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या