Makar Sankranti 2025 : सनातन धर्मात मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) दिवस फार खास मानला जातो. या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य (Sun) धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर या काळात पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ येते. मकर संक्रांतीच्या दिवशी दान पुण्य करण्याला फार महत्त्व आहे. तर, याच दिवशी शुभ योग जुळून येणार आहे. 


ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य देव सध्या उत्तरायणमध्ये आहे. सूर्य जसा मकर राशीत प्रवेश करेल तसा दक्षिणायनचा काळ सुरु होईल. त्याचबरोबर खरमासदेखील संपेल. त्यामुळे या काळापासून अनेक शुभ कार्याची सुरुवात होणार आहे. सध्या मकर संक्रांतीच्या दिवशी 4 महायोगांची निर्मिती होणार आहे. यामुळे हा दिवस अधिक खास ठरेल. या दिवशी कॉलव, बालव, प्रीती आणि विष्कुंभ यांसारखे योग जुळून येणार आहेत. त्यामुळे हा दिवस फार खास असणार आहे. 


राशींनुसार 'या' गोष्टी दान करा


मेष रास 


मकर संक्रांतीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी तीळ आणि गुळाचा दान करणं शुभ मानलं जातं. 


वृषभ रास 


या राशीच्या लोकांनी गूळ आणि पांढरे तीळ दान करावेत. 


मिथुन रास 


मिथुन राशीने मूगाची डाळ आणि गूळ दान करावं. 


कर्क रास 


कर्क राशीच्या लोकांनी साधे तीळ आणि तांदूळ दान करावेत. 


सिंह रास 


सिंह राशीच्या लोकांनी गूळ, तीळ आणि गव्हाचं दान करावं. 


कन्या रास 


कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी तांदूळ, मूगाच्या डाळीची खिचडी दान करावी. 


तूळ रास 


या राशीच्या लोकांनी साधे तीळ आणि तांदूळ दान करणं शुभ मानलं जातं. 


वृश्चिक रास 


वृश्चिक राशीच्या लोकांनी तीळ आणि गुळाचं दान करणं शुभ मानलं जातं. 


धनु रास 


धनु राशीच्या लोकांनी तांदूळ आणि तीळ दान करावेत. 


मकर रास 


मकर राशीच्या लोकांनी गहू, तीळ आणि गूळ दान करावा. 


कुंभ रास 


कुंभ राशीच्या लोकांनी गूळ आणि तिळाचं तेल दान करावं. 


मीन रास 


मीन राशीच्या लोकांनी तीळ, गूळ आणि चणे दान करावेत. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :           


Gajkesari Rajyog 2025 : 9 जानेवारीला जुळून येणार शक्तिशाली 'गजकेसरी राजयोग'; 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु