Makar Sankranti 2024 : मकर संक्रांत हा सण पिकं आणि सूर्याशी संबंधित आहे. हा सण संपूर्ण भारतात उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सूर्य शनिच्या मकर राशीत प्रवेश करतो. यावर्षी 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल.
सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींचं भाग्य उजाडेल, तर काही राशींना पुढील महिनाभर सावध राहण्याची गरज आहे. या वर्षी मकर संक्रांतीला (Makar Sankranti 2024) सूर्याचं मकर राशीत होणारं संक्रमण 5 राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. पुढील महिनाभर कोणत्या राशींना पैसा, कुटुंब, व्यवसाय, शिक्षण आदी क्षेत्रात सावधगिरी बाळगावी लागेल? जाणून घेऊया.
मकर संक्रांत 2024 पासून महिनाभर या राशींनी राहावं सावध
कर्क रास (Cancer Zodiac)
मकर संक्रांतीला होणारं सूर्याचं मार्गक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतं. व्यवसायिक भागीदारांकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो, व्यवसायात अनेक अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवन महिनाभर तणावपूर्ण राहील. छोट्या-छोट्या गोष्टींवरुन जोडीदाराशी वाद होऊ शकतो, विचारांमध्ये मतभेद होतील. या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. एक महिना कामावर नीट लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, अन्यथा सर्व कामं बिघडू शकतात.
मकर रास (Capricorn Zodiac)
मकर संक्रांतीपासून पुढील महिनाभर मकर राशीच्या व्यक्तींनी आरोग्य, शिक्षण आणि पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अनावश्यक खर्चामुळे तुमच्यावर आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. मकर राशीच्या विद्यार्थ्यांचं मन एकाग्र होणार नाही, त्यामुळे अभ्यासात अनेक अडचणी निर्माण होतील. या काळात तुमचे कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा हे वाद वाढू शकतात.
तूळ रास (Libra Zodiac)
सूर्याचं मकर राशीत झालेलं आगमन तुळ राशीच्या लोकांवरही नकारात्मक परिणाम करेल. तुमच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात. या काळात पैशांचा व्यवहार करू नका, अन्यथा खूप पैसे खर्च होतील किंवा आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं. व्यवसायातील तुमचे प्लॅन आधीच कुणालाही सांगू नका, यामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. कौटुंबिक जीवन थोडे अस्तव्यस्त राहणार आहे, वादाला तोंड फुटू शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या या दिवशी दान करण्याचे महत्त्व