नवी मुंबई : संस्कृती, परंपरा, नवकल्पना, वैदिक ज्ञान आणि समृद्ध जीवनमानाने आपला देश नटलेला आहे. अलिकडे अनेकजण भीती, चिंता आणि नैराश्याने, दैनंदिन गरजांमुळे सतत चिंतेत दिसतात. काहीजण आंतरिक शांती शोधत आहे. मानसिक समाधान शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये दादाश्री यांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलेय. मैत्री महोत्सवात दादाश्री यांचं चिंतामुक्त भारत या विषयावर प्रवचन होणार आहे. चिंतामुक्त व्हा, चिंतामुक्त जगा या घोषवाक्यासह याची प्रसिद्धी केली जात आहे. मैत्रेय दादाश्री यांचं आज वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे प्रवचन होणार आहे. या प्रवचानाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे, असे आयोजनांकी आवाहन केलेय. 


सामाजिक-आध्यात्मिक संस्था 'मैत्रीबोध'ने दादाश्री यांच्या प्रवचानाचं आयोजन केलेय.  मैत्रेय दादाश्री अध्यात्मिक परिवर्तनाद्वारे जनसामान्य माणसांना सर्वोच्च अनुभव घेण्यास मदत करण्यासाठी अनेक दिवसांपासून अथक प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशात परिवर्तनाला मूर्त स्वरूप देण्यासाठी, 'चिंतामुक्त भारत 2032' हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलेय.


तणावमुक्त, चिंतामुक्त आणि समृद्ध राष्ट्र तयार करण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न आहेत. मैत्रेय दादाश्रीजी या उपक्रमाचे नेतृत्व करतात. ज्यामुळे  आपला भारत आध्यात्मिकरित्या सशक्त बनेल आणि खऱ्या अर्थाने विश्वगुरू होईल. सर्वप्रथम आपल्यापासून सुरुवात करून, चिंतामुक्त जीवन अनुभवणाऱ्या नागरिकांसाठी हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. आज वाशी येथील CIDCO Exhibition दादाश्री यांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलेय. 27th December 2023, at CIDCO Exhibition and Convention Center, Vashi, Navi Mumbai येथे आज संध्याकाळी प्रवचन होणार आहे. जवळपास पाच हजार लोकं या प्रवचनाचा लाभ घेण्याची शक्यता आहे. अनेकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यासाठी CIDCO Exhibition येथे मैत्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेय. याला अनेकांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन आयोजकांनी केलेय.  



आणखी वाचा :


Maitreya Dadashreeji Ep 18 :मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, आध्यात्मिक सत्याची 5 मिनिटं