Mahashivratri 2025 Date : हिंदू धर्ममान्यतेनुसार, महाशिवरात्रीला (Mahashivratri 2025) हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवशी भगवान शंकराने गृहस्थ जीवनात प्रवेश केला. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा आणि जलाभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे. यामुळे पुण्य मिळतं अशी मान्यता आहे.
कधी आहे महाशिवरात्री?
हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजून 8 मिनिटांनी सुरु होणार आहे. या तिथीची समाप्ती 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजून 54 मिनिटांनी होणार आहे. महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते. या दिवशी भगवान शंकराची पूजा करुन जलाभिषेक केला जातो.
महाशिवरात्री जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त हा ब्रह्म मुहूर्तापासून सुरु होणार आहे. या दिवशी भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी सकाळची वेळ फार महत्त्वाची आहे. या दिवशी सकाळी 6 वाजून 48 मिनिटांपासून ते 9 वाजून 41 मिनिटांपर्यंत हा काळ भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी सर्वात उत्तम काळ असणार आहे.
त्यानंतर 11 वाजून 7 मिनिटांपासून ते 12 वाजून 34 मिनिटांपर्यंत भगवान शंकराला जलाभिषेक केलं जाईल. त्यानंतर दुपारी 3 वाजून 26 मिनिटांपासून ते संध्याकाळी 6 वाजून 9 मिनिटांपर्यंत ते रात्री 8 वाजून 53 मिनिटांपासून ते 12 वाजून 1 मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ काळ असणार आहे.
महाशिवरात्री जलाभिषेक विधी
- महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठावे. त्यानंतर भगवान शंकराचे ध्यान करावे.
- त्यानंतर स्नान करुन सूर्याला जल अर्पण करावे.
- त्यानंतर मंदिरात जाऊन घरात दही, दूध, मध, तूप आणि गंगाजल मिळून शिवलिंगावर अभिषेक करावा.
- त्यानंतर अक्षता, चंदन, बेलपत्र, सुपारी, पान, फळ, फूल आणि नारळासह वस्तू शिवलिंगावर चढवाव्यात.
- महादेवाच्या मंत्राचा जप करावा.
- भगवान शंकराला फळ, मिठाईसह इतर पदार्थांचा देखील नैवेद्य दाखवावा.
- या दिवशी भगवान शंकराच्या मूर्ती, फोटोसमोर तुपाचा दिवा लावावा.
- शेवटी भगवान शंकराची आरती करावी.
- त्यानंतर भक्तांना प्रसाद द्यावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: