Mahashivratri 2024 : यंदा माघ वद्य चतुर्दशीला, म्हणजेच वर्ष 8 मार्चला महाशिवरात्री (Mahashivratri) साजरी करण्यात येत आहे. भगवान शंकराची कृपा लाभावी यासाठी शिवभक्त या दिवशी शंकराची आणि शंकराच्या पिंडीची मनोभावे पूजा करून उपवास ठेवतात. महाशिवरात्रीचे व्रत केल्याने महादेवाच्या आशीर्वादासोबत सुख-संपत्ती, धन लाभते असं म्हणतात. देशभरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना खास संदेश पाठवून शुभेच्छांचा वर्षाव करू शकता, त्यासाठी काही शुभेच्छा संदेश पाहूया.
महाशिवरात्री शुभेच्छा संदेश (Mahashivratri Shubhechha Sandesh)
बेलाचे पान वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
काल पण तूच महाकाल पण तूच
लोक ही तूच त्रिलोकही तूच
शिव पण तूच आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल
हर हर महादेव!
महाशिवरात्रीच्या तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा!
कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणिंद्र माथा मुकुटी झळाळी
कारुण्यसिंधु भवदुःखहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
अद्भूत आहे तुझी माया,
अमरनाथमध्ये केला वास,
नीळकंठाची तुझी छाया,
तूच आमच्या मनात वसलास
हर हर महादेव!
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
कारुण्य सिंधु भव दु:ख हारी
तुज विण शंभु मज कोण तारी
हर हर महादेव!
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
महादेवामुळेच संसार आणि महादेवामुळेच शक्ती आहे
स्वर्ग सुख आणि आनंद महादेवाच्या भक्तीत आहे
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
दुख दारिद्रय नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो या
महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे
महाशिवरात्रीच्या तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा!
भक्तीत आहे शक्ती बंधू
शक्तीमध्ये संसार आहे
त्रिलोकात ज्याची चर्चा आहे
तो आज शंकराचा सण आहे!
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्या अडचणीवर नसतो कुठला उपाय
त्यावेळी फक्त नामस्मरण हाच एक तोडगा
म्हणा ऊॅं नम: शिवाय
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
शिव शंकरांचा महिमा अपरंपार!
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनंद देवो…
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
‘‘ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||’’
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
हेही वाचा: